छावा संघटने तर्फे १०० विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वितरण


 विश्वप्रभात  21 Jun 2024, 5:59 PM
   

अकोला - छावा संघटने तर्फे येथून जवळच असलेल्या आळंदा येथील १०० विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वितरण करण्यात आले. अकोला येथील एक दानशुर व्यक्तीमत्व रितेश मिर्झापुरे यांनी उत्तम दर्जाची ही दप्तरे उपलब्ध करून दिली होती. छावा चे जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे यांच्या पुढाकाराने आयोजीत करण्यात आलेल्या या  कार्यक्रमात डॉ. दिपक मोरे, डॉ. संजय सरोदे, छावा चे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, प्रमोदराव डुकरे पाटील, रितेश मिर्झापूरे मनाहरेराव मांगटे पाटील. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील  विद्यार्थ्यांनी मलखांबाची प्रात्यक्षिक सादर केलीत. भक्ती नामक बालिकेने आकर्षक असे दिपनृत्य सादर केले. या प्रसंगी वर्ग १ ते चौथी पर्यंतच्या सुमारे १००विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वितरण अतिथींच्या हस्ते करण्यात आले. भविष्यातही अशा  जनपयोगी कार्यक्रमांचे आयोजन छावा संघटने तर्फे करण्यात येणार असून त्या करिता दानशूर व्यक्तीचे सहकार्य लाभत असल्याचे मनोगत शंकरराव वाकोडे यांनी व्यक्त केले. दप्तरे उपलब्ध करुन दिल्या बद्दल त्यांनी रितेश मिर्झापुरे यांचे आभारही मानले. कार्यक्रमास आळंदा ग्राम मंडळाचे अध्यक्ष दत्ताभाऊ पाटील, बंडू पाटिल, सुनील खाडे, पातोंड गुरुजी, राजेश ढोरे, डिगांबर खाडे, रमेश नागे,गजानन खाडे, बन्टी बावस्कार, जगदीश खडसे, आदीत्य वाकोडे, सचीन गावंडे व इतरही गावकरी उपस्थित होते. 

    Post Views:  41


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व