अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी स्वप्निल देशमुख
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
11 May 2024, 2:24 PM
वानखेड : संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील पत्रकार, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष स्वप्निल देशमुख यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या पदावर निवड करण्यात आली आहे.
शासनाच्या विविध योजनांमध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्याने याविरूध्दच्या संघर्षासाठी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली आहे. ते अनेक संघटनांमध्ये कार्यरत असून जनतेच्या समस्या सोडवून अन्याय अत्याचाराच्या विरोधात ते कायम प्रयत्नशील राहण्याची त्यांची नेहमीची वाटचाल आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे शुभेच्छांसह अभिनंदन होत आहे.
Post Views: 152