कापशी येथील दुचाकीच्या अपघातात दोन ठार
अकोला-पातुर रोडवरील घटना
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
11 Mar 2024, 1:43 PM
कापशी : अकोला ते पातुर रोडवरील कापशी येथील उडाणपुलाजवळ एका दुचाकीला अपघात झाल्याने दोन दुचाकीस्वार जाग्यावरच ठार झाल्याची घटना दुपारी घडली आहे.
दूचाकी स्वार पातुरकडुन अकोल्याकडे जाताना कापशी जवळील उडाणपुलाजवळ आज दि.10/03/2024 रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजताच्या दरम्यान दोन व्यक्ती आपल्या दुचाकी क्रमांक एम. एच. 30 एएल 3867 ने जात असताना अज्ञात वाहनाची धडक होऊन अपघात झाला असून सदर अपघातात दुचाकीस्वार आशिष सुरेश खंडारे (वय 24) व आदित्य राहुल खंडारे (वय 22) दोघेही रा.क्रांतीनगर, शिवणी,अकोला येथील असल्याचे निष्पन्न झाले.
सदर घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नवघरे ,तारासिंग राठोड,शेख इस्माईल, श्रीकांत पातोंड,होमगार्ड देशमुख, होमगार्ड ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनाकरीता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला असून ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहेत.
कापशी रोड येथील उडान पुलाचे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले परंतु कापशी गावात जाण्यासाठी व कापशी गावापासून अकोला कडे जाण्यासाठी दोन्ही बाजूने विरुद्ध साईडने वाहन चालकांना वाहन चालवावे लागते परिणामी असे अनेक वेळा अपघात झालेले आहेत तरी नॅशनल हायवे च्या वतीने हा कापशी गावाकडील ला सर्विस रोड कधी चालू होणार का असेच अनेक जणांचे बळी घेणार अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
अकोला ते वाशिम नॅशनल हायवे चे चौपदरीकरणाचे काम चालू आहे कामही पुर्ण झालेलच आहे परंतू अध्यापही कंपनीच्या कडून कापशी रोड येथील उडाणपुलाखालील गावाकडिल सर्विस रोडचे काम पुर्ण करण्यात आले नाही परिणामी कापशी रोड चौफुली असून येथे गावाकडील सर्विस रोड बनणे अत्यंत आवश्यक होते परंतु कंपनीच्या वतीने करण्यात आले नाही परिणामी गावाकडून अकोल्याकडे जाण्यासाठी वरखेड फाट्यापर्यंत विरुद्ध दिशेने वाहन चालकांना वाहन घेऊन जावे लागते व पातुर कडून गावाकडे येताना राजंदा फाट्यावरून विरुद्ध दिशेने कापसी कडे यावे लागते परिणामी लोकप्रतिनिधी व मोंटो कार्लो कंपनी यांच्यावतीने या कामाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे तरी तरी लवकर या सर्विस रोडचे काम केले केले नाहीस तर गावकऱ्या वतीने आंदोलन छेळण्यात येणार आहे.
Post Views: 731