डॉ.मणिभाई देसाई ज्ञानयोग भक्तियोग व निष्काम कर्मयोगी होते : जेष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Apr 2022, 2:29 PM
   

उरुळीकांचन : मगसेस ,पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ मणीभाई देसाईजींनी  ग्रामीणविकास,दुग्धोपादन,कृषी संशोधन तसेच शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य केले.डॉ मणीभाई राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले होते.ते महान क्रांतीवीर ,जहाल मतवादी होते. मात्र महात्मा गांधीजींच्या भेटीमुळे गांधीवादी बनले.विविध क्षेत्रात समर्पित भावनेने निष्काम कार्य करुन मूळचे गुजरातरत्न डॉ. मणीभाई महाराष्ट्र रत्न बनले.पद्मश्री डॉ मणीभाई देसाई म्हणजे गीतेतील ज्ञानयोग,भक्तियोग व निष्काम कर्मयोगाचे जातिवंत उदाहरण होते. असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.अखेरचे गांधीजींचे शिष्य डॉ मणीभाई देसाई ह्यांच्या एकशे दोनव्या जयंती निमीत्ताने येथे डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, निती आयोग संग्लनित दिल्ली,यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी डॉ. मणीभाईंच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आला.मार्गदर्शन करताना डॉ रविंद्र भोळे पुढे म्हणाले की, निसर्गोपचार व बायफ संस्थेची स्थापना करुन डॉ. मणीभाईंनी ग्रामीण विकासाचे विविध प्रयोग साध्य केले,डेन्मार्क वरुन पन्नास वर्षापूर्वी भाकड गाई विमानातून आणून त्यांनी कृत्रीम गोपैदास करून देशातील दुधाची समस्या सोडविण्यासाठी महान कार्य केले.वेळी समर्पित भावनेने कार्य करनाऱ्या कार्यकर्त्याना सन्मानित करण्यात आले.ह्या वेळी हवेली तालुका महनुभाव पंथाचे अध्यक्ष नंदकुमार मुरुकूटे सह अनेक कार्यकर्त्यना डॉ रविंद्र भोळे ह्यांचे हस्ते गौरवण्यात आले.कार्यक्रमाला अमोल भोसले पत्रकार दै केसरी,सामजिक कार्यकर्ते नीलेश चौधरी,मिरेंद्र कांचन,सौ संगीता भोळे संचालक अस्मिता महिला नागरी पतसंस्था अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    Post Views:  402


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व