अग्निवीर पुरूषोत्तम याची देशमुख ६०० मधून बेस्ट रिक्रुट म्हणून गौरवशाली निवड


आई वडीलांचाही मेरी संतान देश को समर्पित पदकाने सन्मान
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Jun 2024, 10:48 AM
   

देशमुख समाज गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळयातही पुरूषोत्तमचा गौरव
अकोला - आयुष्यात काही तरी आगळे वेगळे करून दाखविण्याचे  ध्येय दाखविणारे समाजातील तरूण अनेक क्षेत्रात नेत्रदिपक यश संपादन करून राष्टसेवेत स्वतःचे योगदान सिध्द करीत असतात.अशाच ध्येयासक्तीतून सैन्यसेवेत दाखल होऊन शौर्याचा संकल्प करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील  सिंदखेड लपाली येथील 
पुरूषोत्तम धनंजय देशमुख या तरूणाला प्रशिक्षणातून सर्वोत्कृष्ट म्हणून गौरविण्यात आले.त्याने  सैन्न्यदल प्रवेशाच्या आसक्तीतून मराठा रेजिमेंट मध्ये ३ पुरस्कार मिळवून कठोर मेहनतीने ट्रेनिंग पूर्ण केले.त्या परिश्रमाचे फलित म्हणून त्याने  ६०० अग्निवीरांमधून सन्मानपूर्वक निवड होण्याचा बहूमान प्राप्त केला‌.द मराठा लाईट ईन्फंट्री रेजिमेंट सेंटर बेळगाव येथे दि.०४ जून २०२४ रोजी एक ट्रेनिंग पूर्ण केलेल्यांचा दिक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रिक्रूटमध्ये सामिल झालेल्या ६०० मधून ६ यशस्वी  अग्निवीरांची बेस्ट रिक्रूट म्हणून निवड करण्यात आली.यामध्ये मराठा गटातून  पुरूषोत्तमची यशस्वी निवड झाली.होऊन  त्याबद्दल त्याचा A1000741N-बेस्ट रिक्रूट इन फिजीकल ( पी टी) मेजर एस.एस.बरार मेडल प्रदान करून गौरव करण्यात आला.त्यासोबतच आपल्या मुलाला भारतीय सैन्यदलात पाठविण्याचे धाडस करून त्याला खऱ्या अर्थाने.  पुरूषोत्तम म्हणून सिध्द करण्याची तयारी दाखविणाऱ्या त्याच्या आई वडीलांना सुध्दा मेरी संतान देश को समर्पि
 या गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले.  
          बेळगांव येथील सैन्न्यदलाच्या म्युझियममध्ये अग्रेसर अग्निविर म्हणून‌ पुरूषोत्तम देशमुख यांचा ट्रॉफी सह लावण्यात आलेला फोटो हा मराठा समाजातील नवयुवकांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरणार आहे.पुरूषोत्तम हा जागृती समाज मंडळाचे व लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष संजयबाप्पू देशमुख कंझारेकर यांचे साळभाऊ श्री धनंजय  देशमुख यांचा मुलगा आहे.त्याने प्राप्त  केलेल्या या यशाबद्दल  देशमुख समाज जागृती मंडळ आणि अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाकडून अकोला येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्यात सुध्दा  त्याला बाळापूरचे आमदार नितीनबाप्पू देशमुख यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निर्माण ग्रूपचे संस्थापक- अध्यक्ष गणेशराव देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून कॉंग्रेस नेते अविनाश देशमुख, बालरोगतज्ञ  डॉ.मदन महल्ले ज्येष्ठ मार्गदर्शक के.व्ही.देशमुख,कविताताई ढोरे,सौ.पुष्पाताई देशमुख आदी उपस्थित होते.
        पुरूषोत्तमने सैन्यात दाखल होण्याचे दाखविलेले धाडस,आणि यशस्वी होण्यासाठी केलेली कठोर मेहनत ही देशमुख मराठा समाजातील तरूणांसाठी प्रेरणादायी पाऊल असून  त्याने घेतलेला  देशसेवेचा निर्णय हा त्यांचे आई वडील आणि समाजासाठी सुध्दा अभिमानास्पद आहे.त्याबध्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    Post Views:  181


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व