तारापूर औद्योगिक क्षेत्राचे भोपाळ तर नाही ना होणार? केमबाँड केमिकल कंपनीच्या स्फोटात धुलेश पाटील जागीच ठार.


 संजय देशमुख  2022-04-21
   

 बोईसर -(संतोष घरत) आज दिनांक .२१ एप्रिल रोजी सकाळच्या ९:३० वाजता सुमारास केमबाँड केमिकल, प्लॉट- इ-६/३, इ-४ ह्या कारखान्यातील एलपीजी जवळ असलेल्या सॉलवंटला आग लागून  मोठ्या स्फोटात कारखान्याचा उत्पादक व्यवस्थापक धुलेश पाटील, वय ५४ रा . सफाळे, यांचा जागीच मृत्यू झाला असून एक कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून  मिळाली आहे.                                          सदर आगीचा तांडव नियंत्रणात आणण्याकरिता अग्निशमन दलाचे चार बंब गाडींचा वापर करण्यात आला असून कारखान्यात जागोजागी  ठेवण्यात आलेले साहित्यामुळे त्य कामगारांना बाहेर पडण्यास मोठ्या शर्थीचे प्रयत्न करावे लागले.                                        औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून औद्योगिक वसाहतीत कारखान्याची नियमित तपासणी होत नसून कारखाना मालक देखील अधिकाऱ्यांना लिफाफा (पॉकेट) देऊन आपली चोरीला लपविण्यात पटाईत झाले आहेत.                                     सदर दुर्घटनेनंतर कंपनीच्या स्फोटात मृत्यू पावलेला धुलेश पाटील ह्याचा परिवार व कुटुंब अनाथ झाले, ह्याला सर्वस्वी जबाबदार कंपनीचा मालक व त्यांचे व्यवस्थापन असल्याचे बोलले जात आहे .                       सदर घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक हेगाजे ,पोलीस निरीक्षक सुरेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे ,पोलिस नायक, दया पाटील उपस्थित होते .                 दरम्यान तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात स्पोट आणि आगीचे तांडव सुरूच असून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय याच्या दुर्लक्ष व बेजबाबदार पणामुळे कामगारांचे नाहक बळी जात असून त्यांचे कुटुंब व परिवार अनाथ होते तारापूर औद्योगिक क्षेत्राचे भोपाळ तर नाही ना होणार असा जनतेमध्ये असंतोष पसरल्याचे दिसत असून, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणा सदर घटनेकडे काय कारवाई करणार, हे पाहणे औचित्याचे ठरेल

    Post Views:  374


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व