विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी अकोला येथील डॉ. शिरीष थोरात तर सचिव पदी डॉ. श्रीराम लाहोळे यांची निवड
अकोला -
विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या सर्व कार्यरत नेत्रतज्ञाची एक महत्वपूर्ण सभा अमरावती येथे ग्रँड मैफील इन हॉटेलच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. या सभेत सर्वानुमाने अकोला येथील नेत्रतज्ञ डॉ. शिरीष थोरात यांची विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी तर अकोला येथिलच नेत्रतज्ञ डॉ. श्रीराम लाहोळे यांची सचिव पदावर निवड करण्यात आली. या प्रसंगी सभे करीता प्रामुख्याने उपस्थित हैद्राबाद येथील नेत्रतज्ञ डॉ.संतोष होनावर यांचे हस्ते डॉ. शिरीष थोरात यांना तर दिल्ली येथील नेत्रतज्ञ डॉ. नम्रता शर्मा यांचे हस्ते डॉ श्रीराम लाहोळे यांना पदाचे नियुक्तीपत्र व पदक बहाल करण्यात आले. W
सदर नेत्रतज्ञ सोसायटी ही अतिशय महत्वाची सोसायटी असून नेत्रदानाच्या बाबतीत त्यांचे भरीव कार्य आहे. ही सोसायटी अतीदुर्गम भागातील मुलांना नेत्रसेवा पुरविण्याचे काम सातत्याने करीत असून नेत्रदान शिबीरे, नेत्रदाना बद्दल जनजागृती, काचबिंदु जनजागृती कार्यक्रम, नेत्ररोग शिबीरे, गोरगरीब रुग्णांना नेत्र रोगांवरील औषधांचे मोफत वाटप आदि कार्यक्रम नियमितपणे राबवीत असते.
नेत्रतज्ञांच्या या सभेत अकोला नॅब चे उपाध्यक्ष डॉ. नितिन उपाध्ये, डॉ. अभिजित वैद्य, डॉ. प्रशांत अग्नीहोत्री, डॉ. करंदीकर, डॉ पांगारकर, डॉ. प्रशांत बावनकुळे, डॉ. अरोरा, डॉ. राजेश जोशी, डॉ. लद्दड, डॉ प्रविण व्यवहारे, डॉ. सोनी. डॉ श्रीकांत मालपाणी, डॉ. सुरज उनडकाट, डॉ. अनुराधा राठोड, डॉ. स्मिता कोरडे, डॉ वंदना सिंधी, डॉ. चिंचोले,डॉ. बाहेकर, डॉ. शेळके, डॉ राठोड, डॉ. पुरोहीत. डॉ पाटील, डॉ. बोपी, डॉ. दळणकार, डॉ. भगत, डॉ. सागर भुईभार, डॉ. गुरुदासाणी, डॉ. निशांत राठी, डॉ. निलावार, डॉ दुर्गेश चोले, डॉ. जीमकाटे, डॉ. निलेश जैन, डॉ. मनीष तोटे, डॉ सुनील अग्रवाल, डॉ. पंकज लांडे, डॉ. राहुल तिवारी, डॉ. शमीक मोकदम, डॉ. जुगल चिराणीया. डॉ. सैय्यद जयपुरी, डॉ हुसैन, डॉ अनुपम बागडी, डॉ. विश्वकर्मा, डॉ. राजपुत, डॉ. उमेश रेवणवार, डॉ. निलेश वानखडे यांचे सह विदर्भातील इतरही नेत्रतज्ञ उपस्थित होते.
Post Views: 210