डॉ. बाबासाहेबांच्या मंत्रानुसार राष्ट्रहितासाठी प्रत्येक भारतीय संघटित झाला पाहिजे - ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Apr 2026, 9:50 AM
   

उरुळी कांचन - भारतातच नव्हे तर जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समता व सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून साजरी करण्यात येत असते. पीडित ,शोषित ,वंचित, अन्यायग्रस्त, दलित ,आदिवासी यांच्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महान आहे .भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्यायाचे ऊर्जा स्तोत्र होते ,हे कोणालाही नाकारता येणार नाही .शिका ,संघर्ष करा, संघटित व्हा असा मंत्र त्यांनी दिला. या मंत्रानुसार आज  देशात प्रत्येक भारतीयांनी शिकून, संघर्ष करून संघटित होऊन राष्ट्रहितासाठी कार्य केले पाहिजे असे मत ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.साने संगीत क्लासेस व साने कला मंचच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन साने कला मंच संस्थेचे सचिव शिवराज साने यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार सुनील तुपे, दै.केसरीचे पत्रकार अमोल भोसले यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    Post Views:  9


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व