अकोला, : बार्शिटाकळी तालुक्यातील 9 सहकारी संस्था अंतिम अवसायनात असून, अवसायकांची अंतिम सभा १९ जून रोजी सकाळी ११ वाजता बार्शिटाकळी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सहाय्यक सहकारी संस्था येथे होणार आहे.
संस्थेच्या संचालकांनी अवसायनाबाबत काही स्पष्टीकरण, हरकत, आक्षेप असल्यास सभेसाठी उपस्थित रहावे. असे आवाहन सहायक निबंधक डी.यू. शेकोकार यांनी दिला आहे.
बार्शिटाकळी येथील राजराजेश्वर अभिनव शेती विविध तंत्रज्ञान संगोपन व समृद्धी सेवा सहकारी संस्था, जनकल्याण कृषीविषयक सर्वसेवा उद्योग सहकारी संस्था, जय मुंगसाजी आदिवासी गृहनिर्माण सहकारी संस्था, संत सेवालाल मागास गृहनिर्माण सह संस्था, महात्मा फुले दूध पूर्ण प्रकल्प अभिनव सहकारी संस्था, अभिनव मागास गृहनिर्माण सहकारी संस्था, जय बिरसा अभिनव शेती विविध तंत्रज्ञान संगोपन व समृद्धी सहकारी संस्था, बजरंग मजूर कामगार सहकारी संस्था, बार्शीटाकळी प्रीत सॉफ्ट कृषीविषयक सर्वसेवा उद्योग सहकारी संस्था आदी संस्था अवसायनात ठरविण्यात आल्या आहेत.
Post Views: 170
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay