रोजगार नोंदणीसाठी चारही झोन कार्यालयात व्यवस्था


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  19 Apr 2022, 9:32 PM
   

अकोला  - बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने पालकमंत्री बच्चु कडू यांच्या संकल्पनेतून व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 14 एप्रिल 2022 ते 1 मे महाराष्ट्र दिन या कालावधीमध्ये रोजगार नोंदणी पंधरवाडा राबविण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये पुर्व, पश्चिम, उत्‍तर आणि दक्षिण चारही क्षेत्रीय (झोन) कार्यालयामधून बेरोजगार युवक युवतींची नोंदणी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तरी शहरातील सर्व बेरोजगार युवक युव‍तींना अकोला महानगरपालिका व्‍दारा आवाहन करण्‍यात येत आहे कि, त्‍यांनी आपली नोंद संबंधीत क्षेत्रीय कार्यालय येथे करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे.  
येथे होईल रोजगार नोंदणी
पूर्व झोन कार्यालय – जुनी मनपा शाळा क्रं. 15, अजमेरा हॉस्‍पीटल समोर, रतनलाल प्‍लॉट, अकोला.
पश्चिम झोन कार्यालय – जुनी मनपा शाळा क्रं. 1, डाबकी रोड पोलीस स्‍टेशनच्‍या बाजुला, डाबकी रोड, जुने शहर, अकोला.
उत्‍तर झोन कार्यालय – जुनी मनपा शाळा क्रं. 2, पाण्‍याच्‍या टाकीजवळ, रेल्‍वे स्‍टेशन रोड, अकोला.
दक्षिण झोन कार्यालय – मौलाना अब्‍दुल कलाम आझाद कॉम्‍प्‍लॅक्‍स, सिंधी कॅम्‍प, अकोला.

    Post Views:  217


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व