पंजाबराव देशमुखांचे सर्वस्पर्शी कार्य हा एक क्रांतीकारी अविस्मरणीय ईतिहास


पंजाबराव देशमुख जयंती उत्सव दिनी मान्यवरांचे प्रतिपादन
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Dec 2023, 2:16 PM
   

अकोला - श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या दिपस्तंभाने समाजातील  युवकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणाऱ्या स्व.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुखांचे शिक्षणासोबतच सहकार,कृषी आणि ईतर  क्षेत्रातील सामाजिक उत्थानाचे कार्य हा एक अविस्मरणीय क्रांतीकारी ईतिहास म्हणून सिध्द झालेला आहे.त्यांनी स्वतःउच्चशिक्षित होऊन त्या प्रवाहात अनेकांच्या जीवनाला विकासाची दिशा देण्यासाठी १० वर्षांच्या मंत्रीपदांसह या तपस्यापूर्ण साधनेत अवघे आयुष्य खर्ची घातले. असे भावनिक प्रतिपादन जयंती उत्सव प्रसंगी मान्यवरांनी केले.
         स्थानिक महसूल कॉलीनीतील शाश्वत अकोला फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या कार्यालयात स्व.भाऊसाहेबांच्या १२५ व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हारार्पण,वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज व स्व.भाऊसाहेब देशमुख यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी माजी मुख्याध्यापक देशमुख समाज उपाध्यक्ष के.व्ही.देशमुख,डोंगरगावकर,प्रा.संजय देशमुख,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष व अकोला जिल्हा देशमुख समाज अध्यक्ष संजय एम.देशमुख(निंबेकर)पत्रकार ,प्रिन्टर राजेन्द्र देशमुख ,व शाश्वत कंपनी संचालक विश्वासराव देशमुख यांनी भाऊसाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी मनोगते व्यक्त केली.
         या कार्यक्रमाला वरील वक्त्यांसह वसंतराव देशमुख,नारखेडकर,देशमुख समाज जागृती मंडळ अध्यक्ष संजय देशमुख (कंझारेकर), अश्विन देशमुख,राजाभाऊ देशमुख(कवठळकर),यशवंत देशमुख,योगेश देशमुख,हरिष देशमुख,अंकूश देशमुख,प्रविण देशमुख,शरद किन्होळकर व ईतर समाजबांधव उपस्थित होते‌.कार्यक्रमाचे संचलन अश्विन देशमुख यांनी केले.

    Post Views:  255


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व