पातूर पोलिस स्टेशन हद्दीतील पिडीतेची सुटका: आरोपीस अटक !
एकून ११८ गुन्ह्यांचा तपास:पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
10 Apr 2024, 10:54 AM
अकोला - अकोला पोलिस विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून पातूर पोलिस स्टेशन हद्दीतील पिडीत मुलीचा शोध घेऊन वाडेगाव येथून सुटका करण्यात आली.या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेऊन पातूर पोलिस स्टेशनच्या हवाली करण्यात आले.पातूर पोलिस स्टेशनमधील कलम ३६३ व ३७० या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे देण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी आणि पिडीत मुलीचा शोध प्रथम अमरावती,खामगांव व शेगाव येथे घेण्यात आला होता.त्यानंतर बोडखा येथे चौकशीतून माहिती मिळाल्यावरून सदर पिडीत मुलगी आणि आरोपीला पाडेगाव येथून ताब्यात घेण्यात येऊन पातूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई मानवी अनैतिक वाहतूक कक्षाने जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह,अप्पर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय.उज्ज्वला देवकर,सपोनि कविता पुसे,पोउपनि मनोहर वानखेडे,सूरज मंगरूळकर,धनराज चव्हाण,पूनम बचे,अविन्द्र खोडे,यांनी केली.अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने आतापयर्यंत भादंवी च्या कलम ३६३,३६६ (अ) घ्या ८५ आणि हरविल्याच्या ३३ अशा एकून ११८ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून ते उघडकीस आणले आहेत.
Post Views: 126