अखेर अमरावती डी आर डी ए च्या प्रकल्प संचालकाचा पदभार काढला!


उमेदीच्या आंदोलनाला यश : अन्यायग्रस्त महिलेला थकित मानधन मिळणार!
 विश्वप्रभात  14 Aug 2025, 8:46 PM
   

अमरावती - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून उमेदीच्या कंत्राटी कर्मचारी महीलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी उमेद च्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले होते.या  प्रकरणाची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली,तातडीचे प्रकल्प संचालक हा पदभार काढून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कार्यरत एका कर्मचारी महिला  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांनी सतत मानसिक त्रास देऊन वेतन सुध्दा रोखले होते,संसाराचा गाडा चालवणे कठीण झाल्याने टोकाचे पाऊल उचलत सदर कर्मचारी महिलेने  आत्महत्याचे पाऊल उचलले.तातडीने वेळीच उपचार झाल्याने अनर्थ टळला.या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस निखिल पुंडलिकराव देशमुख यांनी दखल घेऊन कारवाईचा मुद्दा रेटुन धरला होता.मध्यंतरी आमदार रोहीत पवार यांनी सुध्दा मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन कार्यवाही च्या सुचना दिल्या होत्या. उमेदीच्या कर्मचाऱ्यांनी सुध्दा आपबिती चे पाळे रोहीत पवार यांचेकडे वाचले होते. उमेदच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सुध्दा प्रकल्प संचालकाच्या विरोधात आंदोलन छेडले होते . या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई चा बडगा उगारत प्रिती देशमुख यांचा पदभार काढण्यात आला.सदर अन्याय ग्रस्त महिलेचे अनेक वर्षा पासूनचे थांबलेले मानधन देण्याच्या सुचना सुध्दा देण्यात आल्या.
डिआरडीए च्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.त्यांच्या जाचाचे केवळ एक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.प्रकरणाची सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई ही आमची प्रमुख मागणी राहील
श्री निखिल पुंडलिकराव देशमुख 
प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट

    Post Views:  98


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व