कृष्णराव देशमुख ( निंबेकर) यांचे आकस्मिक निधन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2023-04-20
अकोला - निंबा येथील प्रतिष्ठीत नागरीक, परिसरातील राजकीय,सामाजिक अध्यात्मिक घडामोडींमधील एक संवेदनशील अभ्यासू व्यक्तिमत्व स्व.श्रीधररावजी देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव श्री.कृष्णराव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने काल दि.१९ एप्रिलच्या रात्री ८.३० च्या दरम्यान निधन झाले.
निंबा परिसरातील शेतकरी संघटनेचे आक्रमक,संघर्षशील नेते असलेले कृष्णराव यांचा निंबा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या विकास कार्यात मोलाचा सहभाग होता. आपल्या हिन्दी शेरशायरीने ईतरांना उर्जा देऊन आनंदीत करणारे होते. पत्रकारीतेशीही त्यांचे जवळचे संबंध होते अनेकांशी स्नेहबंधप्रस्थापित करणारे ते हजरजबाबी उत्कृष्ठ वक्ते होते.वडील स्व.श्रीधरराव देशमुख व त्यांचे ज्येष्ठ बंधू स्व.रमेशचंद्र देशमुख यांच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्या घराण्याचा आध्यात्मिक,सामाजिक वारसा सुरू ठेवला होता.त्यांना मधूमेह आणि काही कीरकोळ व्याधी होत्या.जाण्यापूर्वी त्यांनी वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या शताब्दी वर्षात त्यांचे चिरंजीव मंदार यांच्या नियोजनात विविध उपक्रमांनी वर्षभराच्या श्रीधर पर्वाचे आयोजन केले होते.गेल्या २३ आणि २४ फेब्रूवारीलाच त्या महोत्सवाची सांगता झाली होती.कदाचित ती त्यांची अखेरची इच्छा ठरली असावी.ईश्वर त्यांना सद्गती आणि चिरकाल शांती देवो..!आलेल्या सुचनेनुसार त्यांची अंत्ययात्रा आज गीता नगर येथील त्यांचे राहते घरून निघून सकाळी ११.०० नंतर त्यांचे अंत्यविधी पार पडले.
Post Views: 255