थकीत मालमत्ता करापोटी दुकानाला ठोकले सील
अकोला – मालमत्ता कर वसुलीचे आव्हान पाहता अधिकार थकीत असलेल्या मालमत्तांना सील लावण्याची कारवाई महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उत्तर झोनमध्ये मालमत्ता सील करण्यात आली.
अकोला महानगरपालिका उत्तर झोन अंतर्गत फतेह चौक, मोमीनपुरा येथील वार्ड क्रं. सी – 2, मालमत्ता क्रं. 931, धारक अब्दुल्ला खान इब्राहीम खान यांचे कडे सन 2017-18 ते 2023–24 पर्यंतचे थकित मालमता कर 2 लाख रुपये असल्याने सदर मालमतावर मनपा जप्ती पथकाव्दारे सील लावण्याची कारवाई करण्यात आली.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला थकित व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा करून सील व जप्ती सारखी अप्रीय कारवाई टाळून मनपा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी केले आहे.
सदर कारवाई मनपा उपायुक्त गीता ठाकरे, सहा.आयुक्त विठ्ठल देवकते तसेच कर अधिक्षक विजय पारतवार यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईत सहा. कर अधिक्षक हेमंत शेळवणे, नारायण साखरे, मोहन घाटोळ यांचेसह स्वाती इंडस्ट्रीज चे कर्मचा-यांचा समावेष होता.
Post Views: 221