राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन 12 डिसेंबरला दानापूर येथे आयोजित


 संजय देशमुख  09 Dec 2021, 1:14 PM
   

अकोला : कैलासवासी शामराव बाप्पू सार्वजनिक वाचनालय, स्वर्गीय बापूसाहेब ठाकरे कला अकाडमी, मराठी बोली साहित्य संघ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक दानापूर येथील कविवर्या स्वर्गीय बापूसाहेब ढाकरे साहित्य  नगरी , खोडे प्रतिष्ठान दानापूर येथे दिनांक 12 डिसेंबर 2021 वार रविवार ला मराठी बोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय नींमा अरोरा यांच्या शुभहस्ते तर संमेलनाध्यक्ष ना. ग. थोटे ज्येष्ठ साहित्यिक वरोरा, प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र घोरपडे कोल्हापूर, सन्माननीय अतिथी म्हणून अजिंक्य भारत चे संपादक पुरुषोत्तम पाटील आवारे, प्रहार जिल्हाध्यक्ष सुधाकर खुमकर, ज्येष्ठ साहित्यिक  विजय पाटील इंगळे चितळवाडी, नरेंद्र इंगळे अकोट, शशिकांत मंगळे सरपंच कसबे गावान, इंजिनीयर भाऊ थोटे सप्तखंजेरीवादक  वर्धा, गजानन काकडे जि प सदस्य, लक्ष्मण उगले वर्हाडी कट्टा, उज्वला कांबळे वाचक चळवळ, लक्ष्मण दारगुळे, ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे  अकोला, गजानन वारकरी  मुंडगाव, आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी दोन  संवाद सत्र होणार आहेत. माझ्या बोलीचे प्रमाण मराठीत योगदान, माझ्या बोलीचे वैशिष्ट्य, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मराठी मायबोली चा गजर, सुरेश भट यांचे गझल गायन, बापू गुरुजी पोस्टरचे प्रकाशन व वाचन, त्यानंतर कवी संमेलन, पाच वाजता समारोपीय कार्यक्रम, प्रमुख उपस्थिती पालक मंत्री मा बच्चू कडू, लोकमतचे संपादक माननीय किरण अगरवाल, हिम्मत ढाले अध्यक्ष अंकुर साहित्य संघ, तुळशीराम बोबडे ज्येष्ठ साहित्यिक व सचिव सपना ताई वाकोडे सरपंच दानापूर, सागर ढगे उपसरपंच आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या साहित्य संमेलनाचे सूप वाजणार आहे तरी या साहित्य संमेलनाला राज्यातील साहित्यिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर, डॉक्टर अजय विखे, डॉक्टर प्रतिमा इंगोले, स्वागताध्यक्ष अनिल गावंडे आदींनी केले आहे.

    Post Views:  247


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व