युवराज मगर व सार्थक गोरे या विद्यार्थ्यांना डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बेस्ट स्टुडन्ट एक्सलन्स अवॉर्ड
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
05 Jan 2026, 9:36 AM
युवराज मगर व सार्थक गोरे या विद्यार्थ्यांना डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बेस्ट स्टुडन्ट एक्सलन्स अवॉर्ड 2025 देऊन गौरविण्यात आले. सलग 2015 पासून हा पुरस्कार दिला जात आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी तर कार्याध्यक्षा संध्या आवेकर यांनी शाळेची गुणवत्ता, उपक्रमशीलता, विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य या वर्षभराच्या अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन वैशाली सैंधाणे यांनी तर स्मिता जाधव यांनी आभार मानले.
स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
Post Views: 30