जि. प. सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवू : सि. ई. ओ. सौरभ कटीयार
जि. प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेसोबत चर्चा
अकोला- जिल्हा परिषदेमधील सर्वच संवर्गातील सेवानिवृत्त कर्मचायांच्या समस्या अग्रक्रमाने सोडविण्याचा आपण प्रयत्न करू तसेच सर्वच विभाग प्रमुखांना योग्य त्या सुचना देवून त्यांच्या प्रलंबीत मागण्या पूर्ण करण्यावर भर देवू असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले आहे.
जि.प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेवून विविध समस्या व मागण्या बाबत चर्चा करून निवेदन सादर केले असता कटीयार यांनी सदर आश्वासन दिले. संघटनेचे अध्यक्ष भाऊराव लांडे, उपाध्यक्ष प्रदीप खाडे, उपाध्यक्ष प्रेमकुमार खत्री, कोषाध्यक्ष अशोक मांगुळकर यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला.या चर्चेत प्रामुख्याने पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांचे निवृत्तीवेतन १ तारखेला अदा करण्यात यावे, आश्वासीत प्रगती योजने अंतर्गत १२ वर्षाचा पहिला, २४ वर्षाचा दुसरा व त्या नंतरचा तिसरा लाभ मंजूर करणे, बांधकाम विभागातील स्थापत्त्त्व अभियांत्रिकी सहाय्यकांना कनिष्ठ अभियंता पदाची वेतनश्रेणी लागू करणे, आरोग्य विभागा मधील सहाय्यक परिचारीकांना प्रशिक्षीत परिचारीका या पदाचे ग्रेड पे मंजूर करणे, सेवा निवृत्त शिक्षकांचे पटोपाध्याय वेतन श्रेणीतील निवड श्रेणीचे सर्व प्रलंबीत प्रस्ताव सुधारीत करणे, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देणे, निवृत्त वेतन धारकांना ए.टी.एम. सुविधा पुरविणे, सेवा निवृत्त कर्मचारी व जेष्ठ नागरीकांचे सुविधेकरीता जि. प. परिसरात स्वतंत्र अभ्यांगता कक्ष स्थापन करणे, अकोला जि.प. गृह निर्माण संस्था जि. प. नगर खडकी २. नं. ३५० मधील सेवा निवृत्त व मयत झालेल्या कर्मचान्यांना घर बांधणी कर्जाचे ना देय प्रमाणपत्र मिळणेबाबत व शासकीय कोषागारात जमा केलेल्या हप्त्याये चलान विभाग प्रमुख व गट विकास अधिकारी यांचे मार्फत शासनाने उर्जा व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई यांना उपलब्ध करून देणेबाबत. याशिवाय काही कर्मचान्यांच्या व्यक्तीगत प्रकरणांवरही या प्रसंगी चर्चा करण्यात आली.
Post Views: 207