लोकस्वातंत्र्यकडून स्व.अजितदादा श्रध्दांजलीसाठी रविवारी शोकसभा


 विश्व प्रभात  31 Jan 2026, 11:05 AM
   

अकोला* -महाराष्ट्राच्या राजकारणातील अचानक ढासळलेला  बळकट बूरूज, परखड वक्तृत्व आणि दबंग नेतृत्वातील विकासाच्या प्रकाशाने अविस्मस्मरणीय ठरलेला हृदया हृदयातील कोहिनूर हिरा ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री स्व अजितदादा पवार यांना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना व‌ समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.त्यासाठी रविवार दि.०१ फेब्रूवारी २०२६ रोजी जैन रेस्ट्रो,जनता बॕंकेच्या बाजूला जठारपेठ अकोला येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
     याप्रसंगी लोकस्वातंत्र्य अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचेसह ज्येष्ठ पत्रकार प्रदिप खाडे ,प्रा.डॉ.संतोषभाऊ हुशे,पुष्पराज गावंडे,प्रा.प्रकाश डवले,राष्ट्रवादीच्या मंदाताई देशमुख,कृष्णा भाऊ अंधारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या भावनिक प्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ सभासद,पदाधिकारी,विचारमंथन सभासद,स्नेहीजण व सर्व पत्रकार बांधवांची उपस्थित अपेक्षित आहे.असे आवाहन लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून करण्यात येत आहे.
====================================

    Post Views:  9


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व