वीरच्या सरपंचपदी सौ.मंजुषा संतोष धुमाळ झाल्या विराजमान
वीर: श्री.क्षेत्र वीर (ता.पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत काॅग्रेसच्या उमेदवार सौ.मंजुषा संतोष धुमाळ ह्या १,५४१ मते घेऊन विजयी झाल्या असून त्यांनी हर्षला धसाडे (११९१),मीनल धुमाळ (१०५२)यांचा पराभव केला.तिन्ही उमेदवार अतिशय तुल्यबळ असल्याने ही लढाई अतितटीची झाली व यात सौ.मंजुषा संतोष धुमाळ यांनी बाजी मारली.
दोन सर्वसाधारण उमेदवार व एक ओबीसी उमेदवार यांच्यात मतांची विभागणी होऊन ओबीसी उमेदवार निवडून येईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता परंतु वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.संतोष बापू धुमाळ यांच्या पत्नी सौ.मंजुषा संतोष धुमाळ या विजयी झाल्या.संतोष धुमाळ यांचा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत असलेला दांडगा जनसंपर्क, वीर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेली लोकोपयोगी कामे , पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप दादा धुमाळ व कार्यकर्त्यांनी घेतलेली अपार मेहनत यामुळे हा विजय शक्य झाला.
ग्रामपंचायतीचा कारभार करताना समाजातील सर्व घटकांना समान न्याय देणार तसेच गावविकासाच्या कामात गावातील ज्येष्ठ नागरिक, हितचिंतक तसेच विरोधकांना ही विश्वासात घेतले जाईल व पाच वर्षांत गावाचा शक्य तितक्या जलद गतीने विकास केला जाईल असे आश्वासन नवनिर्वाचित सरपंच सौ.मंजुषा संतोष धुमाळ यांनी दिले.आगामी काळात सगळ्यांना विश्वासात आणि बरोबर घेऊन ग्रामविकास करु असे संतोष बापू धुमाळ यांनी सांगितले.
Post Views: 341