घे भरारी: डिप्रेशनचं चक्रव्यूव्ह यशस्वी भेदले, अवघं आकाश मोकळे जाहले!
नवी दिल्ली- डिप्रेशन किंवा नैराश्यानं शारीरिक किंवा मानसिक पातळीवर पोखरलं जातं. नैराश्याच्या काळात व्यक्तीची स्थिती चक्रव्यूव्ह्यात सापडलेल्या अभिमन्यू सारखी होते. इच्छाशक्तीसोबत मार्गही खुंटतो. हजारोंच्या गर्दीत एकटेपणं मनाला पोखरतं. एकाग्रतेच्या अभावी मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो. मानसिक तज्ज्ञांच्या मते, ड्रिपेशनच्या अनेक पातळ्या आहेत. प्राथमिक टप्प्यावरच नैराश्याला ‘ब्रेक’ लावता येतो. मात्र, नैराश्याने पातळी ओलांडल्यास डॉक्टरांच्या उपचाराची गरज भासू शकते. डिप्रेशनचा पराभव करण्यासाठी पौष्टिक आहार आणि निरोगी जीवनशैलीची आवश्यकता असते. सकारात्मकतेची भावना जोपासण्यामुळे निराशेतून बाहेर पडता येते. नैराश्यातून बाहेर पडण्याचे काही संकेतही मिळतात. ज्याद्वारे नैराश्याची मिठी सैल झाल्याची जाणीव आपल्याला मिळते. जाणून घेऊया नैराश्यातून बाहेर पडण्याचे संकेत देणारी काही लक्षणे-
रागावर नियंत्रण
डिप्रेशनग्रस्त व्यक्तींना रागावर नियंत्रण ठेवणे अशक्य ठरते. त्यामुळे स्वत:ला हानी पोहचविण्याची शक्यता असते. डिप्रेशनमुळे भावना बदलतात. कधी आनंदाचे क्षण अनुभवतो तर कधी रागामुळे भावना अनियंत्रित होतात. डिप्रेशनची शिकार झालेल्या व्यक्तीला छोट्या-छोट्या गोष्टींवरुन राग येतो. नैराश्याचा अनुभव घेणारी व्यक्ती रागावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम ठरल्यास नैराश्याची मिठी घट्ट झाल्याचे समजावे.
आनंद क्षणांत सहभागी
डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीचे मन कशातही गुंतत नाही. मन क्षणाक्षणाला विचलित होतं. डिप्रेशनमधून बाहेर पडताना मन पुन्हा उभारी घ्यायला लागतं. आनंदाच्या क्षणात सहभागी होते. खेळाच्या कृतीत सहभागी होता येते. गाणं गुणगुणनं किंवा पेटिंग यासारख्या गोष्टीत मन रमविल्यामुळे डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचे संकेत मिळतात. व्यक्ती सकारात्मक असल्याचे लक्षणे यावरुन ठरतात.
चिडचिड कमी होणे!
डिप्रेशनचा सामना करणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होतो. नेहमी चिडचिडा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला खुश करणे अशक्य ठरते. व्यक्तीमध्ये सकारात्मकतेची भावना वाढीस लागल्यास चिडचिडेपणा आपोआपच कमी होतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडणारी व्यक्ती अनेक गोष्टींकडे कानाडोळा करायला सुरुवात करते.
चर्चेत सहभाग
डिप्रेशनच्या आहारी गेलेली व्यक्ती इतरांसोबत कनेक्ट होत नाही. अबोलपणा वाढीस लागतो. कुटुंबातील सदस्य किंवा मित्र त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र, डिप्रेशनग्रस्त व्यक्ती बोलणे टाळते. त्यामुळे डिप्रेशनग्रस्त व्यक्ती बोलण्याचा प्रयत्न करू लागल्यास किंवा फोनद्वारे संवाद साधू लागल्यास समजावे डिप्रेशनमधून पुन्हा बाहेर पडत आहे.
Post Views: 206