बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानतर्पेâ,. प्रबोधन नगर,खडकी बु. चा दि २७ऑक्टोबर २०१९ रोजी १७ वा वर्धापन दिन


उपासक-उपासिका, तरुण-तरुणींच्या हर्षाचं डॉ. बाबासाहेब प्रबोधन भवन झालय १७ वर्षाचं
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Oct 2023, 12:19 PM
   

अशक्य ते शक्य करून दाखविले :- जेंव्हा प्रबोधन भवनाच्या निर्मितीचा प्रस्ताव सुर्वानुमते मांडण्यात आला व दोन कोटीचे भवन बनवायचे ! काहींनी हे अशक्य असं वाटणारं होतं, परंतू कोणतीही गोष्ट अशक्य नाही यावर ठाम असलेले प्रा. मुवुंâद भारसाकळे सर यांनी प्रबोधन भवनाच्या कामाला सुरुवात केली, जागेचीही पाहणी केली. सुरुवातीला दोन कोटी रुपयाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. प्रत्येकांनी पाच हजार रुपये देऊन सदस्य व्हायचे असे ठरविण्यात आले. तेंव्हापासून प्रा. भारसाकळे सर, रमेश तायडे साहेब, अशोक इंगळे साहेब ह्या त्रिमूर्ति व त्यांचे इतर बाणेदार सारथी या टीमने एवढे मनावर घेतले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन  ऐतिहासिकरित्या समाजाच्या उत्थानासाठी बनवायचेच असा चंग बांधल्या गेला व पायाला भिंगरी बांधल्यागत सकाळी घरातून निघून जायचे व रात्री कधी १२ वाजता, कधी १ वाजता कधी २ वाजता घरी यायचे. आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेऊन  ‘‘फक्त एकच ध्यास - प्रबोधन भवनाचा विकास’’,  हे उद्दीस्ट समोर ठेवल्याने बौद्ध समाजातील नोकरीदार वर्ग ते मजूर वर्ग यांच्या भेटीगाठी घेणे सुरु केले. समाजातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रबोधन भवनाचे खास उद्दीस्ट म्हणजे हे भारतातील एकमेव असे प्रतिष्ठान आहे की, यामध्ये तीन हजाराहून अधिक उपासक या संस्थेचे मालकी हक्क सदस्य आहेत. सुरुवातीला या ठि़काणी एका ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली व प्रत्येक आठवड्याला कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. येथे धम्माची शिकवण देण्याचे काम सुरु झाले. बालक-बालिकांना येथे त्रिशरण, पंचशिल बुद्ध विचाराची  शिकवण देण्यात आली. बुद्धाचा शांतीचा विचार जगाला तारू शकतो व अंधश्रद्धा एक थोतांड आहे हे विद्याथ्र्यांच्या मनावर बिंबवण्याचे काम करण्यात आले. सध्या या प्रबोधन भवनाची क्षमता दोन हजार लोक खुर्ची टावूâन बसू शकतील एवढी भव्य आहे! व पहिल्या माळ्यावर बी.जे.एम.सी., नर्सिंग कॉलेजची निर्मिती आहे, दुसNया माळ्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘राष्ट्रभूषण’ वाचनालय आहे.   तिसNया माळ्यावर एम.पी.एस.सीच्या विद्याथ्र्यांसाठी  क्लासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. व चौथ्या माळ्यावर भव्य विहार असून पाचशे लोक ध्यान साधना करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच भंतेजीच्या राहण्याकरीता देखिल स्पेशल व्यवस्था केलेली आहे.
माझ्या दाणी समाजाचा मला अभिमान : कोण म्हणतो माझा बौद्ध समाज दाणी नाही, इतर समाजामध्ये १००/- रु. वर्गणी देण्यासाठी मागे पुढे पाहल्या जाते. सद्यस्थितीत ६० कोटीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान  प्रबोधन भवन याच समाजाच्या दानाच्या माध्यमातून उभे राहिलेले आहे. ६० कोटीचा उपक्रम उभारणारा दाणी बुद्ध समाज व त्या समाजाचा मी एक घटक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. परंतू अशा चांगल्या कामाकरीता टिमचा कर्णधार अष्टपैलू असावा लागतो. तद्वतच आमच्या या टिमचे कप्तान प्रा. मुवुंâद भारसाकळे सर हे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी आहेत. त्यांचे संघटन कौशल्य, त्यांचे भाषण कौशल्य, त्यांचे वत्तृâत्य कौशल्य व सामाजिक जान, लहानपणापासून भोगलेल्या यातना व समाजासाठी काही तरी करण्याची धडपड यामुळे संपुर्ण समाजाने त्यांचेवर कमालीचा विश्वास टावूâन भरभरून दान त्यांचे पदरात टाकले आहे. हा डोलारा उभा करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या तब्येतीची पर्वा केलेली नाही, खाण्यापिण्याची तमा बाळगली नाही व प्रबोधन भवन त्यांनी व त्यांच्या विदवत्ता भरलेल्या या टिमच्या माध्यमातून प्रबोधन भवनाचे काम साकार झाले आहे.  या ठि़काणी आता  ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अ‍ॅण्ड सोशल वर्वâ, अकोला’’ कॉलेजची निर्मिती झाली आहे.  त्यामध्ये समाजकार्य पदवीर अभ्यासक्रम (बी.एस.डब्ल्यु.), पत्रकारिता व जनसंवाद पदवी अभ्यासक्रम (बी.जे.एम.सी.), पत्रकारिता व जनसंवाद पदवीत्तोर अभ्यासक्रम (एम.जे.एम.सी.) अमरावती विभागातून सर्व सोयीनी युक्त कॉलेजची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रबोधन भवनाचे उद्दीष्टे : -
महाराष्ट्रामध्ये नंबर एकचे बौद्ध समाजाच्या शैक्षणिक व आंबेडकरी उत्थानासाठी बनवल्या गेले आहे. समाजातील मुला-मुलींचे विवाहासाठी दुसNया ठि़काणी व्यवस्था करण्याचे काम सुरु झाले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या धर्तीवर स्वत:च्या मालकीची २०० एकर जमीन असावी म्हणून तसाही प्रयत्न सुरु झाला आहे. समाजाचा पैसा इतर भटा-बामणाच्या घशात जाणारा समाजाचा पैसा वाचणार आहे. तसेच बाजूला लॉर्ड बुद्धा लॉन्स  निसर्ग सौंदर्यात भर घालत आहे.  महाराष्ट्राभरातून लोक भेटीसाठी येत आहेत.  त्यांचे मन प्रसन्न झाल्या शिवाय राहणार नाही, एवढे मात्र निश्चीत ! तसेच सांस्कृतीक कार्यक्रमासाठी तर मेजवाणीच ठरणारे आहे.  अगदी शांत वातावरणात, प्रशस्त विचारपीठ आहे, लाईटची व्यवस्था कमालीची आहे, आवाज अख्या हॉलमध्ये घुमतो आहे.  कधी बघीतला नसेल असा डोळ्यात भरणा जोगे प्रबोधन भवनाची निर्मिती झालेली आहे.
या प्रबोधनभवनाच्या माध्यमातून बचत गटाची निर्मिती केली आहे,  ाqजल्ह्यातील फार मोठा बचत गट वंदनाताई तायडे यांच्या मार्गदर्शनातून उभा झाला आहे. सुभेदार रामजी आंबेडकरांच्या उत्कर्ष अर्बन व्रेâडीट को.ऑप. सोसायटी., डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अ‍ॅण्ड सोशल वर्वâ, उत्कर्ष लँड हेव्हलपर्स वंâपनी, साप्ताहिक समाज न्यायपत्र, प्रतिष्ठान धम्मसंस्कार वर्ग, प्रतिष्ठान आरोग्य क्लिनिक, प्रतिष्ठान दिशा डायग्नोस्टिक सेंटर, दंत चिकित्सा व मुखरोग मार्गदर्शन आदी उपक्रम सुरु आहेत.
सुभेदार रामजी आंबेडकरांच्या उत्कर्ष अर्बन व्रेâडीट को.ऑप. सोसायटी उपलब्ध करून दिली आहे. समाजाने आपला पैसा इतरत्र न गुंतविता आपल्या समाजाचीच सहकारी बँक बनविण्याचे फार मोठे उद्दीष्ट आहे, ते लवकरच पुर्णत्वास येणार आहे. या बँकेमध्ये प्रत्येक तालुक्यात शाखा असणार आहे व प्रत्येक शाखेमध्ये ाqशपायापासून ते अधिकाNयापर्यंत समाजातील तरुण-तरुणी नोकरदार असणार आहे म्हणजेच पैसे तर जमा होईलच परंतू समाजातील युवक-युवकांना नोकरी देण्याचे मुख्य उद्दीष््ट्ये समोर ठेवण्यात आलेले आहे. ‘धम्मरथ शववाहीनी’ समाजाच्या मालकीची आहे,  तसेच ट्रॅव्हल्स वंâपनी सुरु करून देखिल भारत दर्शन याच माध्यमातून माफक दरात समाजाला सेवा देण्याचा उपक्रम आहे.
समाजातील मुला-मुलींची लग्नासाठी दुसNया ठिकाणी काम सुरु केले आहे. थोडा-थोडा का होईना पैसे येण्याची आवक सुरु झाली आहे. या रक्कमेतून प्रा. भारसाकळे सरांनी तालुक्याचे ठि़काणी शेती घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा सारखा उपक्रम राबविण्याचा मनोदय निश्चीत केला आहे. या घेतलेल्या जमीनीवर   समाजातील मजुर वर्ग त्यामध्ये महिला, पुरुष, तरुण वर्ग यांना वेगवेगळ्या पदाची जबाबदारी सोपविल्या जाणार आहे. त्यांनर बारमाही रोजगार मिळेल अशी व्यवस्था केली आहे. त्या शेतीच्या उत्पन्नातून त्याच तालुक्यातील समाजातील जनतेला ़कायम स्वरुपी रोजगार निर्मिती होणार आहे. कायम स्वरुपी मजूर वर्ग समाजाचाच असणार आहे.  असे प्रत्येक तालुक्यामध्ये करण्याचे योजीले आहे. त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान प्रबोधन भवनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी समाजातील मुला-मुलींसाठी ‘केजी टु पीजी’ पर्यंत शिक्षणाची उच्च दर्जाची सोय व्हावी म्हणून कान्व्हेंट उभारण्याचे ़काम सुरु झाले आहे.  सरकारी शाळा बंद करून बहुजनांच्या लेकरांनी शिवूâ नये असे धोरण मनुवादी सरकारने  बनविले आहे म्हणून समाजातील विद्यार्थी मागे राहू नये म्हणून प्रा. भारसाकळे सरांनी शिक्षण विषयक धोरण ठरविले आहे. ते या प्रबोधन भवनाच्या माध्यमातून होऊ शकते असा त्यांदा दृढ विश्वांस आहे. तसेच तिसNया माळ्यावर प्रशस्त असे देशातील नंबर एकचे   ़....... ग्रंथालय तीथे कोणतेही पुस्तक, ग्रंथ कोण्याही विद्याथ्र्यांनी मागीतले असल्यास त्यांना मिळेल अशी व्यवस्था तयार केली आहे. असे प्रशस्त ग्रंथालय प्रबोधन भवनाच्या तिसNया माळ्यावर अत्याधूनिक सोयी सुविधासह सुरु झाले आहे.  तसेच बाजूलाच रमाबाई आंबेडकर भवनामध्ये  समाजातील १९९ गरीब  विद्याथ्र्यांकरीता राहण्याची व्यवस्था आहे, तसेच त्यांना ज्ञानार्जनाकरीता  व्यवस्था करण्यात आली आहे. याच विद्याथ्र्यांमधून मोठमोठे अधिकारी निर्माण होण्याकरीता त्यांचेसाठी एम.पी.एस.सी, यु.पी.एस., आय.ए.एस., आय.पी.एस. चे क्लासेस चालविल्या जाण्याची व्यवस्था सुरु झाली आहे.   समाजावर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर या प्रबोधन भवनाच्या माध्यमातून वकीलाची टीम बनवण्यात आली आहे.  ते त्यांना न्यायदानासाठी मदत करेल अशी व्यवस्था बनविली आहे.  तसेच समाजातील डॉक्टर येथे येऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामांकीत डॉक्टर समाजाला रोगमुक्त करण्यासाठी धजावणार आहे. तसेच ५ एकर जमीन घेवून हॉस्पीटलची निर्मिती देखिल सुरु झाली आहे.
एवंâदरीत या प्रबोधनाचे माध्यमातून शिक्षण, शेती, बँका, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, समाजसेवी यांच्या उन्नतीसाठी प्रोत्साहन  देण्याचे काम होणार आहे. लाखो रुपये इतरत्र खर्च होणारे समाजासाठी खर्च होईल म्हणून जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील सभासद असलेल्यांनी व इतरांनीही आपल्या मुला-मुलींचे विवाह  आपल्याच या प्रबोधन भवनाने दुसNया ठि़काणी केलेल्या सभागृहामध्येच करावे व आपले सत्कर्मी दान समाजाच्या उन्नतीसाठी लागेल याची जाण असू द्यावी. या प्रबोधन भवनाला एक तप लोटून गेले आहे, समाजाच्या उन्नतीसाठी, भल्यासाठी, उत्कर्षासाठी बनवल्या गेलेल्या प्रबोधन भवन आज रोजी २७ ऑक्टोबरला सतराव्या वर्षात पदार्पण करीत आहे, प्रबोधन भवनाच्या वर्धापन दिनाच्या  तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आंबेडकरी अनुयायांना आमच्या कोटी कोटी मंगलकामना  !
- पंजाबराव बकाराम वर,
न्यू महसूल कॉलनी, खडकी. बु. अकोला.
मो. ९९२२९२४६८४.

    Post Views:  98


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व