डॉ वंदन मोहोड यांच्या मातोश्री विमलबाईंचे निधन


नागपूरच्या एम्स हॉस्पिटल ला देहदान
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  14 Nov 2024, 9:19 AM
   

अकोला..... येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुल सचिव प्रा डॉ वंदन मोहोड खेडकर नगर अकोला यांच्या मातोश्री तथा प्रख्यात विचारवंत व सहित्यिक डॉ बाबासाहेब मोहोड माधान यांच्या धर्म पत्नी श्रीमती  विमला बाई मोहोड यांचे आज दि 12 नोव्हेंबर रोजी अमरावती येथे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 94 वर्षाचे होते.
       विमलाबाईंचे निधन झाल्या नंतर त्यांचा मृत देह नागपूर येथे  त्यांचे पुत्र डॉ नंदन मोहोड यांचे निवास स्थानी नेण्यात आला. तेथे सर्व सोपस्कार आटोपल्या नंतर स्व. विमला बाईंचा देह एम्स हॉस्पिटल नागपूर येथे दान करण्यात आला.
             मरण पावल्या नंतर सुद्धा आपण समाजाच्या उपयोगी पडावे या उदात्त हेतूने व देह दानाची चळवळ जिवंत राहावी या हेतूने आईचा देह आपण दान करीत असल्याची माहिती डॉ वंदन मोहोड यांनी दिली. नागपूर येथील सेवादल कॉलेजचे प्राध्यापक डॉ सुशील मेश्राम व देहदान चळवळीचे प्रणेते सामाजिक कार्यकर्ते डॉ चंद्रकांत मेहर यांचे या कामी विशेष सहकार्य  लाभले.

    Post Views:  64


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व