नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर झालेली शाईफेक, राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind ) यांची रायगड भेट, नागालँडमध्ये दहशतवादी समजून मजुरांना घातलेल्या गोळ्या आणि सावरकरांच्या मुद्यावर भाष्य केलं. नागालँडच्या प्रकरणावर सरकारनं माफी मागितली आहे. कधी कुणाला दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात तर कधी आमच्यासारख्या लोकांना देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकले जातं. आमच्यावर फक्त गोळ्या घालत नाहीत एवढंच, असल्याचं संजय राऊत म्हणाले. आमच्या सारख्या लोकांच्या मागे सुद्धा सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून छळ केला जातो, अशा प्रकारे राज्य करण्याची विकृती वाढत चालली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात ज्या प्रकारचं कृत्य झालं त्याचा आम्ही निषेध केलेला आहे, असं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष महाराष्ट्रानं देशाला दिलेले आहेत. त्यांच्या विषयी लेखन करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं. कारण कोट्यवधी लोकांच्या भावना युगपुरुषांशी जोडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्यावर काही लिखाण केल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरु, मोरारजी देसाई यांना माफी मागावी लागली. जेम्स लेनच्या लेखनावरुन राज्यात आणि देशात वादळ उठलं होतं. आपण कितीही हुशार असलो, विद्वान असलो तरी भान असलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. तर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनामध्ये गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर झालेल्या शाई फेकीच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असंही ते म्हणाले.
Post Views: 218
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay