बाईकस्वारांसाठी उपयुक्त ठरणारे १०० ग्राम कमी वजनाचे स्मार्ट हेल्मेट


 Sanjay M. Deshmukh  26 Nov 2021, 1:29 PM
   

इंदूर, 26 नोव्हेंबर : साधारणपणे दुचाकी वाहन चालविणाऱ्या लोकांची तक्रार असते की, हेल्मेट घातल्यानंतर आसपासचा आवाज नीट ऐकू येत नाही. या हेल्मेटच्या वजनामुळे मान दुखते. या दोन्ही समस्यांचे निराकरण करण्यासाठी राजीव गांधी प्रौद्योगिकी विद्यापीठाच्या रिसर्च स्कॉलरने एक स्मार्ट हेल्मेट तयार करून त्यात ५ वेंट बसविले आहेत.

हे एकप्रकारचे एअर पास असून, अॅडजस्टेबल आहेत. त्यामुळे वाहनचालक आपल्या इच्छेनुसार याचा वापर करू शकतो. इतकेच नव्हे तर वाहन चालकाच्या हेल्मेटचे वजन १०० ग्रॅम कमी होते, असा दावा हे स्मार्ट हेल्मेट तयार करणारे स्कॉलर प्रज्ञान जैन यांनी केला आहे. वेंट उघडल्यावर त्यात लिफ्ट फोर्स तयार होतो व हवा वर निघून जाते व हेल्मेटचे वजन १०० ग्रॅम कमी होते. हेल्मेट घातल्यावर ज्यांची मान दुखते त्यांच्यासाठी हे हेल्मेट उपयुक्त आहे. वाहनचालक थंडी किंवा ऊन या हिशेबाने ते अॅडजस्ट करू शकतो. 

त्यामुळे हेल्मेट घातल्यावर गुदमरल्यासारखे वाटत नाही. वेंट साऊंड क्वालिटीसुद्धा क्लिअर करतो. स्मार्ट हेल्मेट
घातल्यानंतर मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचा आवाज आणि आसपासचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. यामुळे अपघात किंवा नुकसान होण्याची शक्यता कमी होते. कारण वाहनचालक आवाजाच्या बाबतीत सतर्क होतो. त्यातील व्हेंट साऊंड एनहँसरचे काम करतात. या एका स्मार्ट हेल्मेटची किंमत ८५० रु. ते १००० रु. असल्याचे प्रज्ञान

जैन यांनी सांगितले.  प्रज्ञान जैन यांनी कारसाठी डबल ब्लेड वायपरसुद्धा बनविले आहे. त्यात लावलेल्या रबरामध्ये ग्रॅफिन मिसळले आहे. त्यामुळे ती मजबूत होते. या वायपरमध्ये पहिले ब्लेड काच साफ करते. तर दुसऱ्या ब्लेडमध्ये वेगवेगळे ब्लॉक तयार केले आहेत.

    Post Views:  200


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व