गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा |
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः |
गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुस नमन करीता l
मनुष्य जन्मातला परब्रम्ह ओळखावा l
ह्याच दिनी परब्रम्ह ओळखण्या चक्षु हवे आध्यात्मिकतेचे l
भांडार ज्ञानाचे l खुले करती सद्गुरू च हो l
पुर्व जन्माच्या सुकृता वाचून l.
गुरुकृपा न घडे जान l गुरुसेवेचे महत्पुण्य l
त्या पुण्या जाण नसे धन्य धन्य आमुचें l
पूर्व जन्मींचें सुकृत l ऐसी गुरुसेवा लाभली l
साक्षात् सचेतन सद्गुरुंची सुखाचा शोध उमगला जया मुळे l
मिळाला अद्वितीय आणि परब्रम्ह ज्ञानाचाही
बोध संतोषाच गाभारा स्वामी माझा सद्गुरु होय ll
जे जे कृत्य प्रेमाविण l ते ते अवघे आहे शिन l
ऐसी लाभली प्रेममय भक्ती l गुरुतही दिसे साक्षात् ब्रम्हांड नायक मुर्ती ll
तुची माझ गणगोत l तुझी बाप आणि माऊली l
स्पर्श तुझा होता भाली l लाभली सुखाची सावली ll
अशक्य ही शक्य करती हे गुरु l नमन माझे तुमच्या चरणी l
जन्मोजन्मी लाभो ही गुरुसेवा l स्विकार करावा नमस्कार l गुरुपौर्णिमेचा ll
पल्लवी देशमुख (निंबकर)
Post Views: 93