छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक गुण घेण्यासारखा आहे - सरपंचा सौ.अनुराधाताई मेतकर*


 विश्व प्रभात  19 Feb 2024, 10:16 PM
   

अकोट: जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा खैरखेड येथे स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खैरखेड गावच्या सरपंचा सौ.अनुराधाताई विजय मेतकर तर  प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच श्री. सुभाषभाऊ गोंडाने व शाळेचे मुख्याध्यापक श्री रघुनाथ माळवे सर उपस्थित होते. यावेळी शाळेतील तसेच गावातील लहान मुला मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज व जिजाबाई यांची वेशभूषा साकारली होती. 
          यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. यानंतर शाळेच्या कु.शिवानी डोबाळे, मयुरी चोपडे, अक्षरा खंडेराव गार्गी खोब्रागडे,प्रणव भटकर आलोक गणवीर,आरोही तायडे,चैताली गणवीर,मनस्वी रायबोले,धनंजय चोपडे,धनश्री खंडेराव,निशिका वानखडे,आकांक्षा वानखडे, विजया गोमासे या विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने भाषणे दिली. व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच  दिव्या वानखडे प्रतीक्षा भटकर यांनी गीत गायन व पोवाडे गायन मोठ्या उत्साहात केले.
        यानंतर शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री शशिकांत भड सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजनाविषयी माहिती सांगितली तसेच श्री संदीप कुलट सर यांनी युद्ध कलेचे कौशल्य मुलांना समजावून सांगितले तर शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री.विजय हरणे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचे अनेक पैलू मुलांसमोर उलगडून दाखवले व मुलांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. 
       त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री रघुनाथ माळवे सर व खैरखेड गावच्या सरपंचा सौ.अनुराधाताई मेतकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी वर्ग पहिली ते वर्ग आठवी चे सर्व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन दिव्या निरंजन वानखडे व गौरी संजय मेश्राम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलोनी दिनेश मेश्राम व आभार प्रदर्शन शिवानी बजरंग सपकाळ यांनी केले असल्याची माहिती शाळेचे शिक्षक श्री सागर तळोकार सर यांनी शाळेच्या वतीने दिली.

    Post Views:  93


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व