अकोला: महान ते अकोला रस्त्यावरील टिटवन फाट्यासमोर ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, अकोलाकडून महानकडे जात असलेल्या दुचाकी क्रमांक (एमएम.२८, ३८४५) व महान येथून अकोलाकडे जात असलेल्या ट्रॅक्टर यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. रस्त्यावरून जात असलेल्या नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला बोलावून गंभीर जखमीस सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातामुळे महान ते अकोला रस्त्यावर काही काळासाठी वाहतुकीचा खोळांबा निर्माण झाला होता. अपघातस्थळी बघ्याची गर्दी जमली होती. दरम्यान, या मार्गाने दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Post Views: 139
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay