पुण्यातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये अध्यक्ष पारसनीस यांचे जन्मदिनी खेळाडूंचा सत्कार
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
06 Oct 2023, 5:40 PM
पुणे - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ गणेश खिंड,पुणे येथील माजी अध्यक्ष डॉ. पारसनीस यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा थ्रोबॉल विजेत्या संघातील १ ७ वर्षाखालील मुली व मुले खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेतील खेळाडूंसाठी १०,०००/- रुपये तर दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ११५५०/- चेक माजी अध्यक्ष डॉ. पारसनिस यांनी मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्याकडे सुपूर्त केला. याप्रसंगी खेळाडू, माजी विद्यार्थी व प्रशिक्षक ईश्वर टाक, सौरभ वाघमारे, आर्यन नवगिरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच काव्य अभिवाचन स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा सुनिता पारसनीस, स्नेहा वाघमारे, स्मिता जाधव, रेश्मा देवकाते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यात खेळाडूंनी असेच उज्वल यश संपादन करावे व प्रशालेचे नाव देशामध्ये करावे. अशा शुभेच्छा डॉ. पारसनीस यांनी दिल्या. यापुढेही खेळाडूंसाठी व दहावीला परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थिनींसाठी भरघोस आर्थिक मदत केली जाईल असे सांगितले.
Post Views: 305