समाजकार्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Oct 2022, 12:40 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ खडकी, द्वारा संचालित श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी, अकोला. येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, आयुक्त समाज कल्याण अकोला, व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अकोला, जिल्हा जात पडताळणी समिती अकोला, व श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी, अकोला. यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन तसेच देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजकार्य महाविद्यालयात ग्रंथालयाचे नूतनीकरण करून नवीन भव्य दिव्य वास्तू अद्यावत व तंत्रज्ञानाने विकसित अभ्यासक्रमाचे तसेच विविध प्रकारच्या पुस्तकांची भरपूर संख्या अश्या सुसज्य ग्रंथालयाचे उद्घाटन सोहळा असा त्रिवेदी संगम कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्वप्रथम विचार मंचावर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संकेत काळे हे विचार मंचावर उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण अधीक्षिका श्रीमती रेखा ठाकरे मॅडम तसेच कार्यक्रमाला विशेष उपस्थित वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीमान गजानन हरणे साहेब कार्यक्रमाला प्रामुख्याने विशेष उपस्थित समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.केशव गोरे तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित समाजकार्य महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.संदीप भोवते
होते. विचार मंचावर उपस्थित होते.
यावेळी विचार मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नवीन भव्य दिव्य अशा ग्रंथालयाचे उद्घाटन आदरणीय प्रा.डॉ. सुरेशरावजी काळे साहेब (सचिव ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी ग्रंथपाल डॉ.दिपाली देशमुख मॅडम,डाॅ. सुगत मोहोड उपस्थित होते.तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या ठिकाणी युवा महोत्सवामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला,तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण सुद्धा करण्यात आले, तसेच कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालयातील सर्व कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच समाज कल्याण विभागाचे विविध विभागाचे कर्मचारी सुद्धा मोठ्या हर्षवल्यासाने या कार्यक्रमाकरिता उपस्थित होते कार्यक्रम असे सूत्रसंचालन प्रा.डाॅ. अर्चना धर्मे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा.डॉ.केतन वाकोडे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांनी सहकार्य केलं व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
Post Views: 256