श्री संत जंगली महाराज स्कूलमध्ये रंगभरण चित्रकला स्पर्धा
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
05 Feb 2024, 5:33 PM
नांदुरा - श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तथा रेनबो किड्स प्रि प्रायमरी स्कूल नांदूरा येथे आज दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी, वार शनिवार भव्य प्रमाणावर तरुणाई फाउंडेशन खामगाव द्वारे रंगभरण चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व ४६५ विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये भाग घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे मनातील रंग उतरून खूप सुंदर असे चित्र रंगवून या रंगभरण चित्रकला स्पर्धेत रमले होते. याप्रसंगी प्राचार्य श्री. विश्वास मापारी सर, शिक्षकवर्ग व इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 192