शब्दवेलचे प्रवीण बोपुलकर राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटन पुरस्काराने सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  07 Jul 2025, 2:09 PM
   

अकोला : स्थानिक  खेट्री तालुका पातूर जिल्हा अकोला येथील सुप्रसिद्ध साहित्यिक शब्दवेल साहित्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा मुंबई येथे जीएसटी विभागात कार्यरत असणारे श्री प्रवीण बोपूलकर यांना नुकताच परिवर्तन प्रबोधिनी अमरावतीच्या वतीने आयोजित दुसऱ्या  राज्यस्तरीय परिवर्तनविचार  वेध साहित्य संमेलन अमरावती येथे शाल श्रीफळ सन्मानचिन्ह गौरव पत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. सर्जनशील शब्दवेल साहित्य  संघाच्या माध्यमातून साहित्यिकांचे संघटन करणारे प्रवीण  बोपुलकर हे उत्कृष्ट गझलकार असून महाराष्ट्रात सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणून ओळखले जातात त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रात विविध ठिकाणी राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेऊन साहित्यिकांची महाराष्ट्रातील साहित्यिकांची खूप मोठी मोट बांधून त्यांचे संघटन केले आहे हे विशेष.  याच कार्याची दखल घेऊन त्यांना नुकत्याच अमरावती येथे  पार पडलेल्या साहित्य संमेलनात उत्कृष्ट संघटक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले  त्यावेळी विचार पिठावर प्राचार्य रा. गो. चवरे कमलताई गवई शिवाजी चाळक प्रा. नरेंद्र काठोळे कार्यक्रमाच्या आयोजिका प्रा. डॉ. शोभा रोकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मोहोड तर आभार विशाल मोहोड यांनी मानले.

    Post Views:  66


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted