राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे यांना स्वामी विवेकानंद जनसेवा पुरस्कार
अकोला - नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड चे अकोला जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार प्रदीप खाडे यांना त्यांच्या विविध सामाजिक कार्याबद्दल स्वामी विवेकानंद जनसेवा प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. इलना, सिफा व किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक मैत्री हॉटेलचे सभागृहात आज हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या समारोहात शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांना राष्ट्रीय डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी समाज हितासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या धनंजय मिश्रा, दिवाकर गावंडे, अक्षय राऊत, प्रा. डॉ. ममता इंगोले, दत्तात्रेय निघाने वैशाली राऊत, डॉ. अर्चना देशमुख, ललिता पात्रीकर भारती पात्रीकर, शंकरराव बोर्डे, प्रदीप गावंडे , सिद्धार्थ तायडे सुरेश पात्रीकर, डॉ. चंद्रशेखर गोंधळ, बळवंतराव कडू, बाळाभाऊ पात्रीकर यांच्यासह विविध समाजसेवकांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जनसेवा पुरस्कार बहाल करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक प्रा. दादाराव पाथरीकर तसेच जिल्हाध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष गजानन हरणे यांनी डी. एम. के. सेवा मंडळ व निर्भय बनो जन आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोटचे अध्यक्ष ह. भ. प. वासुदेवराव महल्ले पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी नेते प्रकाश पोहरे, माजी प्राचार्या प्रतिभा पाथरीकर, किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिवाकर गावंडे, प्रख्यात समाजसेवक धनंजय मिश्रा, प्रख्यात लेखिका प्रा. डॉ. ममता इंगोले, पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव बोर्डे, माजी सैनिक प्रभू इंगळे उपस्थित होते. सर्वप्रथम अतिथींच्या हस्ते राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, कृषिरत्न डॉ. पंजाबरावजी देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रारंभि युगेश्वरी हरणे यांनी जिजाऊ वंदना व स्वागत गीत सादर केले. प्रा. दादाराव पाथरीकर यांनी प्रास्ताविक करून पुरस्कार वितरणाचा हेतू विशद केला. याप्रसंगी प्रकाश पोहरे, ममता इंगोले, अक्षय राऊत, प्राचार्य प्रतिभा पात्रीकर यांचे सह इतरही अतिथींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास भानुदास कराळे, दीपक आखरे, संदीप देशमुख, सुरेश महल्ले, नंदकुमार गावंडे प्रभाकर चेहे, डॉ. कृष्णकांत वक्ते तन्मय हरणे यांचे सह इतरही प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गजानन हरणे यांनी केले.
Post Views: 9