मानवधर्म पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जे.टी. वाकोडे अविरोध
उपाध्यक्ष दिनकर घोरड,सचिव डॉ.रणजीत देशमुख तर कोषपाल काळे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Nov 2022, 9:09 AM
अकोला , पारदर्शक व्यवहार आणि शितबध्द वाटचालीने आदर्श ठरलेल्या शासनाच्या सहकारनिष्ठ पुरस्कारप्राप्त स्थानिक मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेच्या अविरोध निवड झालेल्या संचालकांच्या सभेत पदाधिकारी निवड सुध्दा अविरोध पार पडली.सहकार अधिकारी श्री गणेश बारस्कर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहून अविरोध निवड घोषित केल्या.
यामध्ये संस्थेचे संस्थापक जेष्ठ संचालक श्री. जे.टी.वाकोडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर श्री.दिनकर घोरड उपाध्यक्ष,डॉ.रणजीत देशमुख सचिव तर कोषपाल म्हणून भास्कर काळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी झालेल्या सामंजस्यपूर्ण चर्चेमध्ये नंतरच्या अडीच वर्षांमध्ये माजी अध्यक्ष पत्रकार संजय देशमुख यांची परत अध्यक्षपदी,त्याचप्रमाणे नंतरच्या याच कालावधित श्री.माणिकराव सरदार यांची उपाध्यक्ष म्हणून तर नव्याने आलेल्या संचालिका सौ.जयश्री बोचरे यांची कोषपाल म्हणून आगामी काळात निवड करण्याचे नियोजित सभेपूर्वी संचालकांमध्ये एकमताने ठरविण्यात आले.
या सभेला नवनिर्वाचित संचालक सर्वश्री.पत्रकार संजय देशमुख,माणिकराव सरदार,सुधीर वाकोडे,देवीदास घोरळ, विजयराव बाहकर सौ.शोभाताई तेलगोटे,सौ.जयश्री बोचरे,व्यवस्थापक नरेन्द्र डंबाळे, विक्की क्षिरसागर,कुंदा ताई पवार उपस्थित होते.
मानवधर्म नागरी सहकारी संस्थेमध्ये स्थापनेपासूनच्या २२ वर्षात अशाच स्नेहपूर्ण भावनांनी विधायक विचारांतील सहकार्याच्या आदान प्रदानाने सहकारात वाटचाल करणारे संचालक कार्यरत असून त्यामुळे सतत अविरोध निवडणूक हा संस्थेने प्रस्थापित केलेला पायंडा ठरलेला आहे.
संचालक मंडळाच्या आगामी सभेमध्ये प्रा.श्री.विजय काटे आणि श्री सुरेश तिडके यांना तज्ञ संचालक म्हणून नियुक्त करण्याचे यावेळी सर्वसंमतीने ठरविण्यात आले.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सर्व पदाधिकारी व संचालक व निवडणूक अधिकारी श्री गणेश भारस्कर यांचे पूष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
Post Views: 130