भेदभाव आणि अनिष्ट प्रथांना टाळून मराठा देशमुख समाजबांधवांच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे ! - गणेशराव देशमुख


मुंबईत देशमुख समाजसेवा मंडळाचा वधू - वर परिचय व व स्नेहमिलन मेळावा ऐरोलीत संपन्न
 संजय देशमुख  2024-01-10
   

 नवी मुंबई -(प्रतिनिधी) समाजाच्या आर्थिक प्रगतीला मारक ठरणाऱ्या लग्नसमारंभातील खर्चिक बडेजावांना बाजूला ठेऊन समाजसेवींनी तो निधी समाजातील दुर्बल बांधवांच्या प्रगतीसाठी खर्च केला पाहिजे.ज्या समाजात जन्माला आलो तेथील ऋण लक्षात घेऊन अशा वधू वर आणि स्नेहमिलन मेळाव्यांसोबतच व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे आणि कला कौशल्यांना विकसित करण्याची संधी देणाऱ्या उपक्रमांचे ही आयोजन झाले पाहिजे असे उदात्त विधायक विचार अकोला येथील निर्माण ग्रूपचे संस्थापक श्री.गणेशराव देशमुख पोटीकर यांनी व्यक्त केले.विदर्भ समाज मंडळाच्या ऐरोली,नवी मुंबई येथील १८ व्या वधू- वर परिचय व‌ वार्षिक स्नेहमिलन मेळाव्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते होते.यावेळी संतोषराव देशमुख आणि अध्यक्षिय भाषणातून सुनिलराव देशमुख व‌ ईतर मान्यवरांनीही सामाजिक प्रगतीचे उद्बोधक विचार व्यक्त केले.

      नव्या मुंबईतील ऐरोली सेक्टर १९ मधील श्री.संत गजानन महाराज मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सुनिलराव देशमुख, सेवानिवृत्त उपनिबंधक सहकार विभाग हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.तर विदर्भ देशमुख मंडळाचे अध्यक्ष आयोजक विठ्ठलरावजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीसह ओमप्रकाशजी देशमुख,भामोदकर, उद्योजक संतोषराव देशमुख, वझरकर, नितीनराव देशमुख,अमरावती उद्योजिका सौ.प्रितीताई देशमुख,अमरावती,अकोला येथील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष,व देशमुख मंडळ अध्यक्ष संजय देशमुख,निंबेकर हे व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी ठाणे ग्रामीणचे डी.वाय.एस.पी संजयजी धुमाळ व गजाननराव देशमुख,अव्वर सचिव अन्न व नागरी पुरवठा, मंत्रालय, मुंबई डॉ .सेवानिवृत्त कृषी उपायुक्त मंगेशराव देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.


        सर्वप्रथम दिलीप प्रज्वलन करून महापुरूषांना वंदन अभिवादन करण्यात आले.विठ्ठलराव देशमुख यांनी प्रास्ताविकातून तर सचिव जगदिशचंद्र देशमुख यांनी त्यांच्या मनोगतातून मंडळाची वाटचाल,उपक्रम,आर्थिक नियोजनाची माहिती देऊन देणगीदार,जाहिरातदार आणि सहकार्य देणाऱ्या सेवाभावी समाजबांधवांचे आभार व्यक्त केले.



       यावेळी उपस्थित अतिथींचे शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.देशमुख मराठा समाज वधु- वर परिचय या सर्वांगसुंदर पुस्तिकेचे याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले‌.या मेळाव्यात उपवर वधू- वर व‌ नातेवाईकांनी परिचय पत्रांचे वाचन केले.या कार्यक्रमाला मिलींद देशमुख,रबाळे,गजाननराव देशमुख,तारापूर,रंगराव देशमुख,बुलढाणा, गजानन महाराज मंदिर अध्यक्ष विकास देशमुख,ऐरोली,अनंत देशमुख,बेलापूर,एन के.देशमुख,दिपक देशमुख, मुंबई, विरेन्द्रजी व सौ.शुभांगी देशमुख,अकोला व महाराष्ट्रातील विधी भागातून आलेले बहूसंख्य समाजबांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेन्द्रजी देशमुख,पंजाबराव देशमुख,अरविंद देशमुख,जगदिशचंद्र देशमुख,विकास देशमुख,विनोद देशमुख,गणेश देशमुख,संजय प.देशमुख,अनिल देशमुख,बाबूराव देशमुख,नरेन्द्र देशमुख,संजय खु.देशमुख,संजय रा.देशमुख,सौ.माधुरी सु.देशमुख व मंडळाचे सर्व सहसदस्य आणि स्नेही हितचिंतकांनी परिश्रम घेतले‌. सुत्रसंचालन गणेश विचारे यांनी तर आभारप्रदर्शन मंडळाचे सचिव जगदिशचंद्र देशमुख यांनी केले.स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.


    Post Views:  269


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व