ज्योती सावित्री ब्रिगेड तर्फे दिव्यांग सोशल फाउंडेशनला एक हात सहकार्याचा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 May 2023, 3:27 PM
   

अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे दिव्यांगांच्या शिक्षण,रोजगार आरोग्यासाठी संपूर्ण भारतभर कार्य केले जात आहे . दि.७ मे २०२३ रोजी गुरुकृपा मंगल कार्यालय येथे ज्योती सावित्री ब्रिगेड आयोजित महिला मेळाव्यात दिव्यांग सोशल फाउंडेशनचा गौरव करण्यात आला यावेळी मंचावर डॉ.प्रफुल्ल वानखडे, जि. प.अध्यक्ष संगीता अढाऊ प्रा. विशाल कोरडे व ज्योती सावित्री ब्रिगेड च्या अध्यक्ष भारती शेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. निरोगी जीवनाचा मंत्र या विषयावर डॉ.वानखडे यांनी व्याख्यान दिले. अकोल्यात प्रथमच २८मे २०२३ रोजी दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे आर.एल.टी.विज्ञान महाविद्यालय अकोला येथे  सायं.५.वा.स्वरकाव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीतकार कौशल इनामदार व अभिनेत्री इरावती लागू यांची विशेष उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगांना व्हिलचेअर, व्हाईट केन, शिष्यवृत्ती, ब्रेल बुक्स चे वितरण केले जाणार आहे. त्याकरिता ज्योती सावित्री ब्रिगेड च्या अध्यक्ष भारती शेंडे यांनी ११ पांढर्या काठ्या प्रा.विशाल कोरडे यांच्या कडे वितरित केल्या. जि.प.अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या सामाजिक कार्यात अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले.सामाजिक कार्याची जाणीव ठेवून दिव्यांग बांधवांना मदत केल्याबद्दल प्रा. विशाल कोरडे यांनी  ब्रिगेडच्या  उपस्थित महिला वर्गांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ज्योती सावित्री ब्रिगेड च्या भारती शेंडे ,माधुरी दाते,विद्या घाटोल, हेमा वरोकार,कल्पना तायडे, सोनिया नीमकर,शारदा धनोकार,छाया हाडोले, स्मिता वरोकार,अलका ढोमने व दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या अनामिका देशपांडे व सुजाता आसोलकर यांनी सहकार्य केले.

    Post Views:  399


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व