रजधुळकार देवकाताई देशमुख यांना गझलक्रांती पुरस्कार


अ.भा.महिला गझल संमेलनात केले जाणार सन्मानित
 संजय देशमुख  15 Nov 2023, 9:41 PM
   

अकोला- अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिका,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी,रजधुळ मासिकाच्या संपादिका व शिक्षणक्षेत्रातील अनाथांच्या माई देवकाताई देशमुख यांना गजल क्षेत्रातील सन्मानाचा गजलक्रांती पुरस्कार जाहिर झाला आहे.

        महाराष्ट्रातील अग्रगण्य गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने आणि पुणे जिल्हा कार्यकारिणी तर्फे सावरकर अध्यासन केंद्र,डेक्कन पुणे येथे रविवार दि.१९ नोव्हेंबर रोजी अ.भा. महिला गझल संमेलनाचे आयोजन करण्यात आहे.गझल क्षेत्रातील महिला संमेलनाचा हा प्रथम प्रयोग असून यामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील महिला गझलकार उपस्थित राहणार आहेत.या संमेलनात देवकाताई उर्फ माई यांना गझलक्रांती मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.गझलकारांच्या प्रतिभांना नवी प्रोत्साहनात्मक नव्या उर्जा प्रदान करून गझलक्षेत्रात घडविलेल्या क्रांतीबध्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे. त्यांच्या रूपाने हा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ तथा अकोला आणि विदर्भाला प्राप्त होणारा एक बहुमान आहे.
 
        या संमेलनासाठी ज्येष्ठ गझलकार शोभा तेलंग (इंदौर) तर स्वागताध्यक्ष म्हणून स्नेहल कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकार संगीता जोशी,यांचे हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून उर्मिला बांदिवडेकर, डॉ.संदिप गुप्ते, किरण केंद्रे, प्रमोद खराडे आणि संस्थेचे सचिव जयवंत वानखेडे उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी गझल साहित्य संस्थेचा गझल अमृत दिवाळी अंक आणि गझलयात्री मालिकेतील तिसऱ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे.

         संमेलनाचे सुत्रसंचलन गझलकार वैशाली माळी करणार आहेत. या संमेलनात एकून सहा मुशायऱ्यांमध्ये देशभरातील महिला गझलकार आपल्या गझल सादर करतील.यामध्ये संगीता जोशी,रत्नमाला शिंदे,श्रध्दा खानविलकर, डॉ.मीना सोसे,सुनीती लिमये,ह्या ज्येष्ठ गझलकार महिलांचा सहभागी आहेत.ज्येष्ठ गझलकार उत्तरा जोशी यावेळी अध्यक्षस्थानी राहणार असून सुत्रसंचलन प्राजक्ता पटवर्धन,यशश्री रहाळकर,अमृता जोशी,रजनी निकाळजे,सरोज चौधरी आणि विजया नवले करतील.

        गझलरसिकांनी या संमेलनाला उपस्थित रहावे असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे,उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखेडे,सहसचिव उमा पाटील, प्रसिध्दी प्रमुख भरत माळी,पुणे विभाग प्रमुख प्रदिप तळेकर,उपप्रमुख डॉ.मंदार खरे,सचिव वैशाली माळी,पुणे जिल्हाध्यक्ष बा.ह.मगदुम,व‌ पूणे जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.असे सौ.महेमुदा शेख,देहूगाव यांनी कळविले आहे.

    Post Views:  443


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व