संतोष घरत - जिल्हा प्रतिनिधी
पालघर : पालघर पोलिसांनी चोरीचे दोन प्रकार तसेच ज्वेलर्सने ७९ ग्राहकांना गंडा लावून पलायन केल्या प्रकरणात आरोपीला अटक करून मोठ्या प्रमाणात मालमत्ता परत मिळवण्यात यश मिळविले आहे. सफाळे येथील गणेश ज्वेलर्स या नावाने सोन्या चांदीचे दागिने बनवणाऱ्या भागीदारी व्यवसायातील दोन इसमांनी जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२४ दरम्यान सफाळे परिसरातील ७९ ग्राहकांना दागिने बनविणे, दुरुस्ती करणे या कामी जुने सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे १कोटी ३८ लक्ष रुपयांचा माल जमा केला होता.
सदर गुन्ह्यामध्ये एका अपराध्याला पोलिसांनी मे २०२३ मध्ये अटक केली होती परंतु कानाराम चौधरी हा आरोपी फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे नव्याने पदभार सांभाळणारे डॅशिंग अधिकारी प्रदीप पाटील व सहकाऱ्यांनी सुमारे दीड वर्ष फरार असलेल्या आरोपीला इंदोर येथून ताब्यात घेऊन त्याचा कडून सुमारे १७ लाख ७१ हजार रुपयांचा सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे. या प्रकरणातील ३९ तक्रारींचे निवारण झाले असून इतर प्रकरणात दागिन्यांची मूळ किंमत याची तालमेल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.
२४ सप्टेंबर रोजी पालघर येथील हॉटेल साई रेसिडेन्सी परिसरात घरफोडी करून सुमारे २१०००/ रुपये किमतीची सोन्याची गंठण व रोख रक्कम चोरी करणाऱ्या भिवंडी येथील रहिवासी असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पालघर पोलीसांनी जुचंद्र येथून अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून हा गुन्हेगार इतर १७ मालमत्त्यांच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याची पोलिसां समोर कबुली दिली आहे. २८ सप्टेंबर रोजी पालघर येथे झालेल्या अन्य एका गुन्हा मध्ये पालघर बायपास मार्गावर इन्स्टाकार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कार्यालयात चोरी करून वीस मोबाईल, पावर बॅंक असे सुमारे ५,१६०००/ रुपयांच्या मोबाईल व संबंधित इतर वस्तू चोरी करणाऱ्या एका आरोपीला पालघर तालुक्यातील बिरवाडी येथून अटक केली आहे. या आरोपींनी चोरलेले मोबाईल हँडसेट, पावर बँक जमिनीत लपवून ठेवल्याचे माहिती मिळाल्यानंतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
Post Views: 49