चलो पालघर ,चलो पालघर ,चलो पालघर २९ एप्रिल OBC चे वादळ पालघर जिल्हाधिकार्यालयावर धडकणार


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Apr 2022, 12:35 PM
   

बोईसर (संतोष घरत) - पालघर जिल्ह्यामध्ये ओबीसीचे आरक्षण शून्य टक्के झाल्याने ओबीसी आक्रमक झालाअसून ह्याचा जाब विचारण्या करिता  २९ एप्रिल २०२२ रोजी ३:०० वाजता  भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .  ह्या पार्श्वभूमीवर मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट याठिकाणी शिवसेनेची सभा झाली. ह्या सभेमध्ये  विधान परिषद आमदार व संपर्क प्रमुख पालघर, माननीय श्री. रविंद्रजी फाटक साहेब ह्यांनी सभे मध्ये बोलताना सांगितले की ओबीसी महा मोर्चाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असून शिवसेना त्यांच्या सोबत असून मोर्चा च्या दिवशी  नगर विकास मंत्री तथा पालक मंत्री (ठाणे- गडचिरोली) माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब व स्वतः फाटक साहेब ओबीसी महामोर्चा मध्ये सामील होतील असे जाहीर करून शिवसेनेतील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक ,युवा सैनिक ह्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास सांगितले. ह्या सभे करिता, पालघर लोक सभा खासदार मा. श्री. राजेंद्र गावित पालघर आमदार श्री श्रीनिवास वनगा  , पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. वैदही वाढाण , महिला आर्थिक विकास महामंडळ राज्यमंत्री दर्जा सौ. ज्योतीताई ठाकरे ,जिल्हा प्रमुख श्री. वसंतदादा चव्हाण ,श्री राजेश भाई शहा  , पहिला संपर्क प्रमुख सौ  ममता चेंबूरकर ,महिला संघटक सौ . ज्योती मेहेर , विधान सभा प्रमुख श्री. निलम संखे, श्री.वैभव संखे, श्री .कुंदन  संखे, श्री. विलास मोरे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक ,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

    Post Views:  499


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted