जनसामान्यांची दिवाळी गोड करणारा शिंदे फडणवीस सरकारचा सर्वसामान्य व मध्यमवर्ग यांना आधार देण्याचा निर्णय आमदार सावरकर


भाजपा प्रदेश सरचिटणीस सावरकर व यांनी केले शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 Oct 2022, 6:57 PM
   

अकोला : दिवाळीसाठी राज्यातील सात कोटी रेशनकार्ड धारकांना जिल्ह्यातील तीन लाख 38 हजार 402 कार्डधारक तसेच 14 लाख 64 हजार 707 नागरिकांनाअवघ्या शंभर रुपयात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेलाचे पॅकेज देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा – शिवसेना युती सरकारचे अभिनंदन करतो. या संवेदनशील निर्णयामुळे सर्वसामान्य, वंचित  , पीडित व समाजाच्या शेवटच्या घटकाची, मध्यमवर्गीय माणसाची दिवाळी गोड होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे  प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर  दिली.
आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण बाहेर पडत असून समाजात नवा उत्साह निर्माण झाला आहे. भाजपा – शिवसेना युती सरकारने निर्बंध उठविल्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्री हे सण दोन वर्षांनी उत्साहात साजरे झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे दिवाळीही उत्साहात साजरी होणार आहे. हे सरकार सर्वसामान्य , मध्यमवर्गीय व समाजातील पीडित वंचितांचे आधार देणारे वमाणसाला न्याय देणारे सरकार आहे.
ते म्हणाले की, पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्याचाही महत्त्वाचा निर्णय भाजपा – शिवसेना युती सरकारने घेतला आहे. ऊन, पाऊस, थंडी, वारा याची पर्वा न करता सदैव दक्षतेने नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलीस दलाला दिलासा देणारा हा निर्णय आहे. आमदार सावरकर सह अकोला जिल्हा भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल किशोर पाटील तेजराव थोरात अनुप धोत्रे शंकरराव वाकोडे राजेश बेले माधव मानकर अर्चनाताई मसने मोनिकाताई गावंडे कुसुमताई भगत चंदाताई शर्मा सचिन देशमुख उमेश गुजर उमेश पवार श्रीकृष्ण मोरखडे संजय जीरापुरे संजय गोडफोडे, संजय गोडा रमेश आप्पा खोबरे डॉक्टर विनोद बोर्डे हिरासिंग राठोड, केशवताथोड, अक्षय गंगाखेडकर, देवाशिष काकड, निलेश नीनोरे अंबादास उमाळे जागीरदार सखावत , श्रीमती मायाताई कावरे जयश्री फुंडकर, योगिता पावसाळे जस्मित सिंग ओबेराय रश्मी अवचार शारदा ढोरे जयश्री दुबे तुषार भिरड, सरकारचे अभिनंदन केले आहे
7ऑक्टोंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री  जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस राजेश्वर नगरीमध्ये येत असून अनेक जिल्ह्याच्या विकास प्रकल्पाला गती प्राप्त होऊन विकास परवाला चालना मिळणार असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सावरकर यांनी व्यक्त केला

    Post Views:  221


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व