अखिल भारतीय न्याय हक्क कलावंत संघटनेच्या विदर्भ उपाध्यक्षपदी निवड
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
08 Oct 2026, 1:52 PM
अकोला : आज अखिल भारतीय न्याय हक्क कलावंत संघटनेची अशोक वाटिका येथे दुपारी अकोला जिल्ह्याच्या सर्व कलावंतांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला अखिल भारतीय न्याय हक्क संघटनेचे
संस्थापक अध्यक्ष माननीय सोमनाथ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले अकोला जिल्ह्याची नवीन कार्यकारणी जाहीर केली अखिल भारतीय न्याय हक्क कलावंत संघटनेच्या विदर्भ उपाध्यक्षपदी महाराष्ट्र व्यसनमुक्ती प्रबोधनकार डॉक्टर धनंजय ओशो बाबा नालट यांची नियुक्ती झाली अकोल्याच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून माननीय प्रदीप मोहोड उपाध्यक्ष मा. मनीष खर्चे कृषी जिल्हा व महानगर कार्यकारणी घोषित करण्यात आलेले आहे यापुढे कलावंत न्याय व समस्या संघटना जोरदार काम करेल असे विदर्भाची उपाध्यक्षपदी निवड झालेले डॉक्टर धनंजय उर्फ बाबा नालाट यांची नियुक्ती करून त्यांच्या विश्वास करण्यात आला व त्यांचं सर्व अकोला जिल्ह्याच्या वतीने कलावंताच्या वतीने अभिनंदन करण्यात येते या कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील सर्व कलावंत माननीय हेमंत मोहोड गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन सदस्य डॉक्टर रत्नपारखी रामराव पाटखेडे डी जे वानखडे व सर्व अकोला जिल्ह्यातील कलावंत हजर होते
Post Views: 8