गणेशोत्सवाचा सर्वांत सुंदर पैलू कदाचित त्याच्या सामूहिकतेत दडलेला आहे - यश सुलभा संजय खोडके


सार्वजनिक बलवंत गणेशोत्सव मंडळ, नमुना, अमरावती येथे श्री बालाजी भगवान तिरुपती दर्शन देखाव्याचे उदघाट
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  16 Sep 2026, 3:09 PM
   

" गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! " च्या गजरात असंख्य रूपांनी, अगणित भावनांनी आणि अनंत चैतन्याने नटलेला गणराया जगभरात विराजमान
सर्वांच्या आयुष्यातील प्रत्येक विघ्न दूर होऊ दे, प्रत्येक मनात प्रेम फुलू दे आणि प्रत्येक घरात आनंद नांदू दे.
यश सुलभा संजय खोडके यांनी केली विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना
अमरावती - गणपती बाप्पा मोरया! हा केवळ जयघोष नसतो., तो महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा स्वर असतो. श्रीगणेश हा विद्येचा, बुद्धीचा आणि कलांचा अधिपती मानला जातो आणि म्हणूनच कलेच्या प्रत्येक आविष्काराशी त्याचे नाते सहज जुळते.या उत्सवाला सामाजिक आशय देण्याचे ऐतिहासिक कार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केले. घराच्या चौकटीतला गणपती बाप्पा सार्वजनिक चौकात आला आणि त्याच्यासोबत समाजही एका नव्या संवादासाठी एकत्र आला.सोमवारी त्याच आगमन झालं आहे ते केवळ मूर्त स्वरूपात. त्याची खरी उपस्थिती तर सदैव आपल्या हृदयात आहे. मातीच्या मूर्तिमध्ये आपण त्याचं दैवी रूप अनुभवतो, त्याच्या डोळ्यांत आपली श्रद्धा पाहतो आणि त्याच्या चरणी आपलं अहंकार, दुःख, चिंता आणि अपेक्षा ठेवतो. मनात भक्ती आणि माणुसकी जागी राहावी कदाचित म्हणूनच तो आपल्याला निमित्त बनवत असतो. त्याचीच पूजा, त्याचीच भक्ती, तोच करविता आणि त्याचीच शक्ती. तोच बुद्धी देतो, तोच बळ देतो, तोच सेवा करवून घेतो आणि तोच आशीर्वाद देतो. आपण तर केवळ निमित्त मात्र! पर्यावरणपूरक मूर्ती, नैसर्गिक रंग, निर्माल्य व्यवस्थापन, ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण, हे केवळ पर्यावरणाचे विषय नाहीत., तर ते आपल्या संस्कृतीच्या प्रगल्भतेचे लक्षण आहेत. परंपरा तीच खरी, जी काळाच्या प्रश्नांना सामोरी जाऊन स्वतःला नव्याने घडवते. गणेशोत्सवाचा सर्वांत सुंदर पैलू कदाचित त्याच्या सामूहिकतेत दडलेला आहे.असे प्रतिपादन यश सुलभा संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी अमरावती येथील नमुना गल्ली क्रमांक - 5 बलवंत चौक परिसर स्थित सार्वजनिक बलवंत गणेशोत्सव मंडळ, अमरावती येथील कार्यक्रमात ते बोलत होते. 76 व्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाची एक अभिनव परंपरा अमरावतीसह पंचक्रोशीत ख्यातीप्राप्त आहे. मंगळवारी या मंडळाच्या स्थळी यश खोडके यांनी भेट दिली.यावेळी यश खोडके यांनी विघ्नहर्ता श्री गणरायाच्या प्रतिमेस नमन - वंदन - पूजन करीत गणपती बाप्पाला माल्यार्पण केले. यावेळी यश खोडके यांनी पार्वतीनंदनाच्या चरणी नतमस्तक होऊन त्याच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यातील प्रत्येक विघ्न दूर होऊ दे, प्रत्येक मनात प्रेम फुलू दे आणि प्रत्येक घरात आनंद नांदू दे. बाप्पा तू आलास की घर भरतं पण खरं तर घरापेक्षा मन भरतं! तू आलास की उत्सव होतो, पण त्याहून महत्वाचं म्हणजे जीवनाला पुन्हा अर्थ मिळतो. अशी प्रार्थना केली. यावर्षी सार्वजनिक बलवंत गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री बालाजी भगवान तिरुपती दर्शन देखावा साकारण्यात आला आहे. या विहंगम देखाव्याचे यश खोडके यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले.याप्रसंगी या विलोभनीय आणि भव्य देखाव्याची प्रशंसा करीत यश सुलभा संजय खोडके यांनी सर्व उपस्थितांना व अमरावतीकरांना गणेशोत्सव - 2026 च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्यात. यावेळी यश सुलभा संजय खोडके यांचा मंडळाच्या वतीने अभिजित देशमुख तसेच मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते शाल - श्रीफळ - पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. शिवाजी जोशी,प्रा. वसंतराव सराफ, ऍड. नितीनभाऊ कोल्हटकर, राजाभाऊ पर्वतकर, गजानन पांडे, अभिजित देशमुख, यश लद्धा, पप्पू अंबारे, सौरभ चुने, विशाल धोटे, मंगेश गोधनकर, अमित पायकर, रोहित कोल्हटकर, रोहित श्रीवास, अतुल पसारकर, रवींद्र गुल्हाने, कुशल देवरे, गोलू पाटील, गौरव पाटील, लोकेश धनस्कर आदिसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी यांच्या समवेत सार्वजनिक बलवंत गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व