बाळापूर तालुक्यात एका व्यक्तीसह २१ बकऱ्या विजेने दगावल्या
अकोला : मंगळवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये बाळापूर तालुक्यातील रहिवासी रवींद्रसिंग चत्तरसिंग चव्हाण हे शेतात असतांना त्यांचा सातारगाव शिवारामध्ये वीज पडून मृत्यू झाला आहे.तर बाळापूर तालुक्यातील बटवाडी शिवारामध्ये एकवीस बकऱ्या विज पडुन दगावल्या आहेत.अशोक पारखे गजानन हरकर साहेबराव हरकर रा.हिवरखेड ता खामगाव यांच्या मालकीच्या त्या बकऱ्या आहेत.वीज पडून या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आले असून शासनाच्या वतीने त्यांना मदत मिळण्याची मागणी होत आहे.
Post Views: 292