मोरगाव भाकरे येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या


 अशोक भाकरे  2023-01-12
   

मोरगाव : पंधरा दिवसांनीं लग्न असलेल्या मोरगाव येथील २८ वर्षीय युवकाने गायगाव येथे रेल्वे खाली झोकून आत्महत्या केल्याची घटना दि १२ गुरुवारी दुपारी घडली .
मोरगाव भाकरे येथील अजय उर्फ गजानन रामदास भोंबळे (२८ ) असे मृतक युवकाचे नांव आहे ,गुरुवारी दुपारी त्यांनी गायगाव रेल्वे स्थानक समोर रेल्वे खाली स्वतःला झोकून आत्महत्या केली .अत्यंत शांत व मनमिळाऊ असलेल्या गजाननने आत्महत्या केल्याचे समजताच गायगाव ,मोरगाव तसेच मित्रपरिवारमध्ये शोककळा पसरली .२७ जानेवारी रोजी लग्न ठरलेल्या गजाननने इतके टोकाचे पाऊल का उचलले  असा प्रश्न सर्वाँना पडला आहे  दोन्ही परिवारात लग्नाची तयारी सुरु असतांना  या घटनेने भोंबळे व वधूकडील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .गुरुवारी संध्याकाळी मृतक अंत्यसंस्कार करण्यात आले

    Post Views:  421


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व