गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने भजन संमेलन संपन्न


 संजय देशमुख  2021-12-21
   

बार्शीटाकळी : येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिरात भरगच्च भजन संमेलन पार पडले. तालुका गुरुदेव सेवा मंडळाचे हाकेला साद देवून तालुक्यातील नव्हे तर तालुक्या बाहेरील भजन मंडळांनी सहभाग नोंदवून भजन संमेलनाचा कार्यक्रम भूतो न भविष्याती असा आनंदाने संपन्न झाला.त्यामुळे ह्या सर्व भजन मंडळातील सर्व भजन दर्दि आणि भजन प्रेमी यांचे खूप खुप आभार.वैराग्य मूर्ती संत श्री गाडगे महाराज यांचे पुण्यतिथी चे औचित्य साधून भजन संमेलनाचे आयोजन केले होते.पुण्यतिथी चे कार्यक्रमाला जिल्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे केंद्रीय तथा ज्येष्ठ पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शविली.सामुदायिक प्रार्थना झाल्यावर वैराग्यमुर्ती श्री गाडगे बाबांच्या पुण्यतिथी महोत्सव मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला. सामुदायिक प्रार्थनेची नव्हे तर सर्व कार्यक्रमाची धुरा श्री खोलेश्र्वर भजन मंडळातील सर्व सभासदांनी जवाबदारी पूर्वक पार पडली त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच ठरेल.भोजन व्यवस्था ज्येष्ठ गुरुदेव सेवक श्री शंकर राव काकड यांनी उत्तमरित्या पार पाडली आणि नेहमी प्रमाणे गुरुदेव सेवा मंडळाचे शहर प्रमुख छोटू आखरे यांनी त्यांना संपूर्ण सहकार्य केले.व विदर्भ कॉलनीतील स्नेही यांनी साथ दिली. गुरुदेव सेवा मंडळाचे हक्काचे सेवक विनय ठाकूर यांचेकडून  साऊंड व इतर साहित्य उपलब झाले.देविदास कावरे यांचे सहकुटुंब अथक परिश्रम कौतुकास्पद आहेत.तरीही सेवा कार्य करताना चुका-उणीवा,सोय-गैरसोय अपेक्षित आहेच.त्यामुळे कार्यक्रमात राहिलेल्या उणीवा व गुरुदेव सेवकांची झालेली गैर सोय या करिता क्षमा करून पुढील तालुक्याचे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यात सहयोग आणि सहकार्य मिळावे ही विनंती.

    Post Views:  205


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व