अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून बाळापूर पोलिस स्टेशन अंतर्गतचा गुन्हा उघडकीस


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  07 Jun 2022, 1:37 PM
   

अकोला ः अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून महिला व बाल अत्त्याचार गुन्हयांमधये कलम 163, 366 (अ) भादवी आणि हरविलेल्या, बेपत्ता महिलांच्या तपासाचे कार्य करण्यता येत असून मागील महिन्यापासून एकूण 33 गुन्हे व 19 बेपत्ता अशी 52 प्रकरणे उघडकीस आणण्यात आली आहेत. बाळापूर पो.स्टे.येथील दाखल 189/2022 अंतर्गतच्या गुन्ह्याचा नुकताच तपासात गुप्त माहितीवरुन पिडीत महिला व तिच्या मुलाचा अकोला येथील नवरंग सोसायटीतील बाजोरिया शाळेजवळून शोध घेऊन त्यांना बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर तसेच अप्पर पोलिस अधीक्षीका मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय खंदाडे, से.पो.नि. महेश गावंडे, पो.उ.नि. सुकेश जमधाडे, पो.उ.नि. विजय खर्चे, पो.हे.कॉ.सुरज मंगरुळकर, आशिष अघडते, पुनम बचे, करिश्मा गावंडे यांनी ही कारवाई केली आहे. इतर गुन्ह्यांमध्ये तत्परतेने पिडीत मुली व आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे. 

    Post Views:  240


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

रक्षाबंधन

४२ मिनेट