काव्य सुमनांनी बहरले विदर्भ लेखिका साहित्य संमेलन


खुल्या अधिवेशनाने महिला साहित्य संमेलनाचा समारोप
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  25 Apr 2023, 7:03 PM
   

अकोला - आपल्या सप्तरंगांनी एकाहून एक बहारदार सर्वंकष विषयांच्या कथा, कविता सादर करीत विदर्भ लेखिका साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या महिला कवियत्री व महिला साहित्यिकांनी रंगत आणून  कथांचा काव्यमय जल्लोष साजरा केला. 
     माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने साकारलेल्या स्थानिक मलकापूर रोड परिसरातील देवकामाई देशमुख प्राथमिक शाळेत सुरू असलेल्या विदर्भ लेखिका साहित्य संमेलनात द्वितीय दिवशी महिला साहित्यिकांचा कथानकाचे सत्र संपन्न झाले. अकोट येथील साहित्यिका डॉ. अनघाताई सोनखासकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या कथाकथन  सत्रात  डॉ. स्वप्ना लांडे, स्मिता भोयटे, विद्या राणे, आशा फुसे, तोष्णा मोकडे आदींनी कथा सादर केल्या. बाजीराव पाटील यांची वऱ्हाडी कथाकथनाची परंपरा वैदर्भीय लेखिकांनी जोपासली आहे. हाच वारसा येणाऱ्या पिढीनेही जोपासावा, असे आवाहन डॉ. सोनखासकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले. संचालन ॲड. रजनी बावस्कर तर आभार डॉ. वैशाली कोटंबे यांनी मानले. दुपारच्या सत्रात साहित्याच्या वाटेवरील अविस्मरणीय क्षण या विषयावर डॉ. ममता इंगोले यांच्या अध्यक्षतेत महिला लेखिकांचा परिसंवाद संपन्न झाला. यात प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यावरून खास संमेलनासाठी उपस्थित झालेल्या प्रा. पौर्णिमा केरकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. या परिसवादात उपस्थित सहभागी महिला लेखिकांनी मराठी साहित्य जगतातील असलेल्या विसंगती व त्यावरील उपाय आपल्या परिसंवादात सादर केले. महिला साहित्य संमेलने ही महिला साहित्यिकांची बुलंद अशी चळवळ झाली पाहिजे असा सूर या परिसरात व्यक्त करण्यात आला. यात ॲड. रजनी बावस्कर, स्मिता किडीले, साधना  काळबांडे, निता अल्लेवार, कोकिळा खोदनकर, विजया भांगे, डॉ पद्मिनी घोसेकर आदी विदर्भातील महिला साहित्यिक व कवयित्री सहभागी झाल्या होत्या. या बहारदार परिसंवादाचे संचालन उज्वला इंगळे यांनी तर आभार संजीवनी काळे यांनी मानले. दुपारच्या सत्रात विदर्भस्तरीय महिला कवयित्री यांचे कवी संमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले. जीवन गाणे या संकल्पनेवर आधारित या कवी संमेलनात महिलांनी काव्यांचा वेगवेगळ्या भावना व्यक्त करील कवितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या, वाईट, श्रद्धा, अंधश्रद्धा, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांवरील व्यथा व संस्काराची मांडणी केली. ज्येष्ठ कवयित्री शीलाताई गहलोत यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या कवी संमेलनात शिल्पा पवार, कृपा ठाकरे, दिपाली पांडे, आशा भिलवंडे,इंदुमती राऊत, सरिता परसोडकर, पंकजा जोशी, स्मिता गंधे, शारदा गणोरकर, शिल्पा ढोक, वर्षा भांदुर्गे, वंदना विंचुरकर,सीमा भांदुर्गे,डॉ. रूपाली सावळे ,कविता राठोड, कविता सुरोशे, भावना टेकाडे, मंजुषा किंजवडेकर, डॉ मोनाली पोफरे, संगीता थोरात, सारिका आडविलकर,वैशाली शिरसाट, रश्मी कुलकर्णी, विशाखा राजे, निर्मला आळणे, शरयू  जीरापुरे, मयुरी टोपरे, रेखा देशमुख आदी विविध जिल्ह्यातील कवियत्रींनी सहभाग घेत आपल्या स्वरचित रचना सादर करीन परिसरात जल्लोष निर्माण केला. संमेलनाचे संचालन चित्रा ,कहाते, उज्वला पाटील यांनी केले, तर आभार डॉ नूरजहा पठाण यांनी मानले. 

 कवी संमेलनाच्या द्वितीय दिवसाचा समारोपीय सोहळा सायंकाळी उत्साहात खुल्या अधिवेशनाच्या रूपाने संपन्न झाला. नीताताई बोबडे
 यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या समारोपीय सोहळ्यात संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. विजय दुतोंडे, प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, संमेलनाच्या संयोजिका देविकाताई देशमुख, शीलाताई गहलोत, सत्कारमूर्ती म्हणून राजेंद्र देशमुख, राजू चिमणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी साहित्य, समाजसेवा,उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राजेंद्र देशमुख, राजू चिमणकर आदींना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तर उद्योजक सुगत वाघमारे यांचा सत्कार अमित खांडेकर यांनी स्वीकारला. यावेळी देवकाताई देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करीत या रखरखत्या उन्हात विविध जिल्ह्यातून प्रामुख्याने सहभागी झालेल्या सर्व कवयित्रींच्या प्रति जिव्हाळा व्यक्त करील संमेलनाची रूपरेखा विशद केली.यावेळी संमेलनाच्या सांस्कृतिक सोहळ्यात सहभाग घेणाऱ्या वर्गाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर प्रस्ताव वाचन शीलाताई गहलोत यांनी केले. संचालन डॉ. अनघाताई सोनखासकर यांनी तर आभार विजया मारोतकर यांनी मानले. या दोन दिवशीय सोहळ्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. विजय दुतोंडे, संयोजिका विजया मारोतकर, देवकाताई देशमुख, माया दुबळे, डॉ. संगीता जीवनकर, अरुणा कडू,मंदा खंडारे, चित्रा कहाते, उज्वला पाटील, डॉ. विना राऊत, डॉ. अनघा सोनखासकर, शीलाताई गहलोत, साधना काळबांडे, डॉ. ममता इंगोले, प्रतिभा पात्रीकर, डॉ. वैशाली कोटंबे, निशा डांगे, कविता शिरभाते, अंजली नालमवार, सोचना मोकळे, विजया कडू, विजया भांगे, डॉ. संजीवनी काळे, ॲड मंगलाताई नागरे, उज्वला इंगळे, डॉ. उषाकिरण आत्राम, डॉ. गीताताई बोबडे, रजनी बावस्कर समवेत माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर तथा विदर्भ लेखिका स्वागत समितीच्या सर्व महिला पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.

    Post Views:  339


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व