पंचगव्हान येथे रुग्णांनी घेतला निशुल्क रोगनिदान शिबिराचा लाभ


 संजय देशमुख  2023-01-31
   

 पंचगव्हाण (प्रतिनिधी): वत्सल मेडिकल रिसर्च फाऊंडेशन अकोलाच्या वतीने स्व. वसंतराव भागवत यांच्या स्मृतींना उजळा देण्या करिता भव्य निशुल्क रोगनिदान शिबिर हे पंचगव्हाण येथे सौरभ वाघोडे यांच्या प्रयत्नाने श्री गजानन महाराज संस्थान यांच्या आयोजनाणे , प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगव्हाण येथे भव्य रोगनिदान शिबिर पार पडले या मधे डॉ. अरुण भागवत शल्यचिकीत्सक,

 डॉ. नरेंद्र भागवत न्यूरो सर्जन, डॉ.अभिषेक भागवत शल्यचिकीत्सक ,डॉ. नमिता काळे स्त्रीरोग तज्ञ, डॉ. कल्पना भागवत स्त्रीरोग तज्ञ, डॉ. नम्रता भागवत, डॉ. हिता भागवत नेत्ररोग तज्ञ, डॉ. ऋषिकेश कडू दंत रोग तज्ञ,डॉ.मनीषा मॅडम, डॉ. शिरभाते प्यथॉलॉजिष्ठ यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. या शिबिराचा शेकडो गरजू रुग्णांनी लाभ घेतला.
यावेळी मोफत औषधोपचार करण्यात आला व तपासणी दरम्यान ज्या रुग्णांना पोटाचे काही विकार, शरीरावरच्या लहान मोठ्या गाठी, गॅस्ट्रॉस्कोपी ह्या सर्व शस्त्रक्रिया १२ फेब्रुवारी रोजी पंचगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथेच वत्सल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर च्या माध्यमातून करण्यात येतील.यावेळी पंचायत समिती सभापती,सर्वच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन महाराज संस्थान सेवेकरी पंचगव्हान, ग्रामस्थ मनब्दा व सर्वच सामजिक कार्यक्रर्ते पंचगव्हाण यांनी प्रयत्न केले.

    Post Views:  170


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व