घरुन बेपत्ता झालेल्या ईसमाचा मृतदेह गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने धरणातुन शोधुन काढला
वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते मंगरूळपीर रोडवरील शेलुवाडा धरणातील घटना
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 Jun 2023, 11:24 AM
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरूळपीरच्या जवानांनी अवघ्या 20 मिनटात शोधुन काढला धरणातील मृतदेह

कारंजा जिल्हा वाशिम येथील नुतन काॅलीनीत राहणारे पद्माकर कीसनराव शेगोकार वय अंदाजे (72) हे 21 जुन रोजी घरुन निघून गेल्याची तक्रार कारंजा पोलीस ठाण्यात मृतकाच्या मुलाने दिली होती. आज सकाळी कारंजा ते मंगरूळपीर रोडवरील शेलुवाडा नजिकच्या पुलावर मृतकाचे चप्पल, शाॅल,चिठ्ठी लिहलेली आढळुन आली या शंकवरुन पद्माकर शेगोकार यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वाटली यावरुन स्थानिकांनी तसेच मच्छीमारांनी पुलाखालील धरणातील शोध घेतला असता काही मिळुन आले नाही.शेवटी कारंजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुभाष जाधव साहेब,कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे सर आणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत साहेब यांनी व शामभाऊ वसई यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले यावेळी लगेचच क्षणाचाही विलंब न करता आपल्या मंगरूळपीर शाखेचे प्रमुख अतुल उमाळे,गोपाल गीरे,लखन खोडे,यांना माहीती देऊन घटनास्थळी रवाना केले घटनास्थळी पोहचुन लगेचच सर्च ऑपरेशन ला सुरवात केली धरणातील घटनास्थळी 15-20 फूट खोल पाणी होते सर्च ऑपरेशन चालु असता 20 मिनटात तळाशी असलेला शेगोकार यांचा मृतदेह पथकाच्या जवानांनी सकाळी 11:00 वाजताच्या दरम्यान वर आणला यावेळी घटनास्थळी कारंजा पोस्ट.स्टे चे पिएसआय सुभाष जाधव साहेब,हे.काॅ.संतोष राठोड साहेब,हे.काॅ.गजानन लोखंडे साहेब,आणी सास चे शामभाऊ सवई हे उपस्थित होते.अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना दीली आहे.
Post Views: 198