अतिक्रमण भोवले ; पामचे उपसरपंच सह सदस्य अपात्र


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Nov 2023, 9:32 AM
   

(संतोष घरत) बोईसर : पालघर तालुक्यातील पाम ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोज पिंपळे व सदस्य वैभवी पिंपळे यांनी सरकारी व गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार संबंधित कार्यालयाकडे करण्यात आली होती.
या प्रकरणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी सुनावणी झाल्यानंतर ते दोषी आढळून आले आहेत त्यामुळे त्यांना उपसपंच व सदस्य पदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
पाम ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांवर पुरावानीशी हरकत घेण्यात आली होती. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचे सांगत हरकती अर्ज निकाली काढण्यात आला होता. त्यानंतर माजी सरपंच अशोक बाबुराव वडे यांनी जिल्हाधिकारी पालघर यांच्या दालनात तक्रारी अर्ज दाखल केला होता. मनोज पिंपळे यांनी सरकारी सर्वे क्रमांक १६ व १६० या जमिनीवर अतिक्रमण करून ग्रामपंचायत व शासनाच्या परवानगी न घेता अनधिकृतपणे आर सी सी बांधकाम सुरू करत ५० भाडोत्री खोल्यांचे बांधकाम केले तर वैभवी पिंपळे यांच्या सासूने सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून ग्रामपंचायत व शासनाच्या परवानगी न घेता अनधिकृतपणे १५ भाडोत्री खोल्यांचे बांधकाम केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी वेळोवेळी सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी उपसरपंच मनोज रमेश पिंपळे व सदस्य वैभवी विशाल पिंपळे यांचे ग्रामपंचायत सदस्य पद आपत्र ठरविले आहे.

    Post Views:  337


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व